'त्या' कारणासाठी मुलाने टोचून घेतलं घोड्याचं इंजेक्शन, पण घडलं भलतंच... वाचा

घोड्याचं इंजेक्शन टोचल्यानंतर काय होऊ शकतं याची त्या तरुणाला अजिबात कल्पना नव्हती, अखेर नको तेच घडलं

Updated: Nov 25, 2022, 07:48 PM IST
'त्या' कारणासाठी मुलाने टोचून घेतलं घोड्याचं इंजेक्शन, पण घडलं भलतंच... वाचा title=

Boy Take Horse Injection: प्रयत्न न करता कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी अनेक जणं शॉर्टकटचा मार्ग निवडतात. पण हा मार्ग किती धोकादायक ठरू शकतो याचा आपण विचारही करु शकत नाही. मध्यप्रदेशमधल्या इंदोरमध्ये (Indore) असाच एक धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. एका मुलाने घोड्याचं इंजेक्शन (Horse Injection) टोचून घेतलं. पण यानंतर त्याची तब्येत इतकी बिघडली की त्याला थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं. इंदोरमधल्या विजय नगर इथं रहाणाऱ्या या मुलाचं नाव जय सिंह असं आहे. 

काय आहे नेमकी घटना?
जय सिंहला व्यायामाची (Exercise) प्रचंड आवड होती. चांगली शरीरयष्टी (Physique) बनवण्यासाठी तो नियमित व्यायामशाळेतही जात होता. पण व्यायामाबरोबरच प्रोटीन आणि सप्लीमेंट (Protein and Supplements) घेण्याचा सल्ला कोणीतरी जय सिंहला दिला. आपलेही सिक्स पॅक अॅब असावेत असं जय सिंहला वाटायचं. त्यामुळे त्याने हा सल्ला मनावर घेतला. प्रोटीन घेण्यासाठी तो एका दुकानात गेला. पण दुकानदाराने त्याला भलताच सल्ला दिला. प्रोटीन आणि इंजेक्शन घेतल्यास दोन महिन्यांनी शरीरात बदल पाहिला मिळतील आणि पिळदार शरीरयष्टी होईल असं दुकानदाराने त्याला सांगितलं.

कल्पना न देता लगावलं घोड्याचं इंजेक्शन
दुकानदाराने दिलेला सल्ला जय सिंहने ऐकला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे करण्यास तयारही झाला. पण दुकानदाराने त्याला कोणतीही कल्पना न देता घोड्यांना दिलं जाणारं इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिल्यानंतर जयची तब्येत अचानक बिघडली. त्याचा पोटात जोराचं दुखायला लागलं आणि उलट्याही झाल्या. जय सिंहची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही दिवसांच्या उपचारानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. यानंतर जयने दुकानदाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. 

हे ही वाचा : टीईटीपाठोपाठ बोगस टायपिंग प्रमाणपत्र घोटाळा? शिक्षण मंडळात लिपिकांचं टायपिंग प्रमाणपत्रं बोगस

दुकानदाराने पोलिसांनी केली अटक
जयच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मोहित आहूजा या दुकानदाराला अटक केली आहे. आरोपी मोहित आहूजाने आतापर्यंत किती तरुणांना अशी इंजेक्शन दिली आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. विजय नगर पोलीस स्थानकात मोहित आहूजाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.