ग्लुकोस्ट्रीपची किंमत कमी करण्यासाठी १५ हजार रुग्णांची स्वाक्षरी

ग्लुकोस्ट्रीपची अवाढव्य असणारी किंमत कमी करण्याची मागणी आता जोर धरू लागली असून १५ हजार रुग्णांनी या निवेदनावर सही केली आहे.

Updated: Dec 17, 2017, 01:12 PM IST
  ग्लुकोस्ट्रीपची किंमत कमी करण्यासाठी १५ हजार रुग्णांची स्वाक्षरी  title=

नवी दिल्ली :  मधुमेहींसाठी महत्त्वाची असलेल्या  ग्लुकोस्ट्रीपची किंमत कमी करण्याची मागणी गेले अनेक दिवस होत आहे. त्यात आता अजून एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. 

 भारताला मधूमेह रुग्णांची राजधानी म्हटले जाते. कोट्यवधींच्या संख्येने डायबिटीज रुग्ण असणाऱ्या आपल्या देशात रक्तातील साखरेची पातळी चेक करण्यासाठी लागणा-या ग्लुकोस्ट्रीपची असणारी प्रचंड मागणी असते. 

१५ हजार रुग्णांच्या सह्या  

परंतु या ग्लुकोस्ट्रीपची अवाढव्य असणारी किंमत कमी करण्याची मागणी आता जोर धरू लागली असून १५ हजार रुग्णांनी या निवेदनावर सही केली आहे.