चांदीच्या दरात घसरण, सोनंही स्वस्त; जाणून घ्या सोन्या-चांदीचे भाव

 मागील काही दिवसांपासून चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. 

Updated: Sep 24, 2020, 08:36 AM IST
चांदीच्या दरात घसरण, सोनंही स्वस्त; जाणून घ्या सोन्या-चांदीचे भाव title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या चांदीच्या दरात घसरण होत आहे. विशेष बाब म्हणजे मागील काही दिवसांपासून चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. बुधवारी कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याच्या तुलनेत चांदीचा दर चार टक्क्यांनी घसरला. सोन्याचा भाव 683 रुपयांनी स्वस्त झाला असून चांदीच्या किंमती 2800 रुपयांनी घसरल्या आहेत. 

बुधवारी सोन्याचा भाव 1.36 टक्क्यांनी घसरुन 49 हजार 698 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे.  तर चांदीचा दर बुधवारी 2812 रुपयांनी घसरुन 58 हजार 401 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे. 

मंगळवारी एक किलो चांदीचा दर 5781 रुपयांनी घसरुन 61,606 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे. तर सोमवारी चांदीचा भाव 67,387 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. सोमवारी सोन्याच्या दरात 672 रुयांची घसरण होऊन सोन्याचा भाव 51,328 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. कोरोना काळात शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा सोन्याच्या गुंतवणूकीकडे मोठा कल आहे.