नवी दिल्ली : जीएसटी कौन्सिलच्या येत्या महिन्यात होणाऱ्या बैठकीत छोट्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणे महाग तर एसी रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणे स्वस्त होण्याची शक्यता आहे.
जीएसटीच्या अंमलबजाणीविषयी अभ्यास करणाऱ्या राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या समितीने एसी रेस्टॉरंटसाठी आकारण्यात येणारा जीएसटी अठरा टक्क्यांवरून बारा टक्क्यांवर आणण्याची शिफारस केली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत याविषयी अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
सध्याच्या दरानुसार छोट्या रेस्टॉरन्टमध्ये ५ टक्के, विना एसी रेस्टॉरंटना १२ टक्के आणि एसी रेस्टॉरंटना १८ टक्के दरानं जीएसटी द्यावा लागतो. यामध्ये एसी रेस्टॉरंटन्स त्यांनी घेतलेल्या कच्च्या मालावर आकरण्यात येणाऱ्या जीएसटीसाठी इनपुट क्रेडिट मिळते.
नव्या शिफारसीनुसार सरसकट सर्वच स्टँड अलोन रेस्टॉरंटना १२ टक्के जीएसटी आकारण्यात येईल. त्याचप्रमाणे त्यांना मिळणारी इनपुट क्रेडिटची सुविधा उपलब्ध होणार आहे