Cooking Tips : Kitchen Tips : म्हणायला तश्या सोप्या टिप्स; पण तुमचं मोठं कामही होईल हलकं...

Cooking Tips : घरातला स्वयंपाक, मुलांना सांभाळणं, ऑफिसचं काम अश्या अनेक कामांमध्ये महिलांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. अशात किचनमधील काम पटापट उरकण्यासाठी काही सोप्या टिप्स तुम्हाला मदत करू शकतात. 

Updated: Feb 22, 2023, 06:35 PM IST
Cooking Tips : Kitchen Tips : म्हणायला तश्या सोप्या टिप्स; पण तुमचं मोठं कामही होईल हलकं... title=

Smart Kitchen Tricks: किचनमध्ये काम करताना बऱ्याच अश्या गोष्टी असतात ज्या आपल्याला माहित नसतात, आणि आपण आपली काम वाढवून ठेवतो. पण तुम्हाला काही टिप्स आज सांगणार आहोत ज्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी अगदी सोप्या होऊन जाणार आहेत आणि किचनमध्ये तुमचा अधिकचा वेळ वाया जाणार नाही. बऱ्याचदा आपल्याला घाई असते आणि त्यात आपण कामं भराभर आटोपण्याच्या नादात भलतंच काही होऊन जात. म्हणजे दूध पटकन गरम करायचं म्हणून गॅस फास्ट करतो तर दूध उतू जातं. भाजी पटकन शिजावी म्हणून गॅस फास्ट करावा तर ती करपून जाते.अश्यावेळी करायचं काय ? असा प्रश्न आपल्याला पडतो आणि म्हणूनच काही सोप्या टिप्स (cooking tips) ज्या किचनमधील वेळ वाचवत आणि कामसुद्धा सोपी होऊन जातील  (kitchen tips)

वापरा या सोप्या टिप्स आणि बना स्मार्ट गृहिणी

  • साखरेच्या डब्ब्यात बऱ्याचदा मुंग्या लागतात साखर चिकट होते अश्यावेळी साखरेच्या डब्ब्यात काही लवंग टाकून झाकण घट्ट लावून ठेवा 
  • बाजारातून आणलेली केळी एका दिवसात काळी पडू लागतात अश्यावेळी केळ्यांच्या देठाला सिल्व्हर फॉईल लावून ठेवावा. असं केल्यास केळी जास्त दिवस टिकतात. (how to prevent banana from getting black and soft)
  • कुकीज किंवा बिस्किट्स बरणीत भरून ठेवताना त्यात संत्राची साल घालून ठेवावं कारण साखरेमुळे काही काळानंतर हे कुकीज कडक होऊ लागतात. 
  • सूप किंवा भाज्यांवर जास्तीचं तेल जमा होतं, ते तेल शरीरासाठी हानिकारक असतं...अश्यावेळी एका भांड घ्या त्यात बर्फाचे तुकडे घाला आणि ते भांड भाजी किंवा सूपवरून फिरवा अश्याने भांड्याच्या तळाशी ते तेल चिकटेल आणि वेगळं होईल .
  • संत्री मोसंबी लिंबू सारखी फळं कापडात गुंडाळून मायक्रोवेव्हमध्ये ठेवावं अश्याने साल काढणं सोपं होऊन जातं.
  • चीझ, बटर व्यवस्थित किसण्यासाठी आधी ते फ्रीझमध्ये ठेवा
  • दूध उतू जाऊ नये म्हणून ते उकळताना त्यावर लाकडी चमचा ठेवावा
  • चपात्या काळ्या पडू नये म्हणून पीठ मळल्यावर त्याला  तेल लावून व्यवस्थित झाकून ठेवावे. (Smart easy kitchen tips for smart woman)