मुंबई : स्मार्टफोन हा आज सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच लोक आपल्याला फोनवरती असल्याचे पाहायला मिळतात. कॉलपासून ते कॅमेरा, कॅलेंड, माहिती, मॅप या सर्वांसाठीच आपल्याला फोनवरती अवलंबून राहावं लागत आहे. परंतु असं असलं तरी आपण फक्त एक मनोरंजन म्हणून फोनकडे सर्वात जास्त पाहातो, परंतु फोन योग्यप्रकारे वापरण्याची पद्धत आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित नसतं, ज्यामुळे तुम्ही संकटात देखील येऊ शकता.
आज आम्ही तुम्हाला अशाच चुकांची माहिती देत आहोत. ज्या चुका बरेच लोक करतात आणि स्वत:चं नुकसान करुन ठेवतात.
अनेकदा लोक स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी कोणत्याही कंपनीचा चार्जर वापरतात, जे चुकीचे आहे. कारण असे केल्याने फोनच्या बॅटरीला हानी पोहोचते.
स्मार्टफोनवर ऍप्स डाउनलोड करण्यासाठी फक्त Google Play Store चा वापर करावा. पण काही लोक थर्ड पार्टी ऍप स्टोअरमधून ऍप डाउनलोड करतात. त्यामुळे फोनमध्ये मालवेअर येण्याचा धोका कायम आहे.
स्मार्टफोनमध्ये येणारी सर्वात मोठी चूक म्हणजे फोनमध्ये येणाऱ्या अपडेटकडे दुर्लक्ष करणे. युजर्सच्या सोयीसाठी कंपन्या वेळोवेळी सिक्युरिटी अपडेट जारी करतात, ज्याच्या मदतीने फोन सुरक्षित ठेवता येतो.
तुम्ही तुमच्या फोनमधील जुने अॅप्स वेळोवेळी अपडेट करत राहता. ऍप अपडेट नसल्यामुळे काही वेळा काही खास फीचर्स वापरता येत नाहीत. तसेच फोन देखील अपडेट स्लो होतो.