King Cobra: एकमेकांच्या जीवावर उठले कोब्रा, व्हिडीओ पाहताच भरेल धडकी

दोन साप मादी कोब्राला प्रभावित करण्यासाठी झुंज करत असल्याचं दिसत आहे. नेमकं कोण बाजी मारतं? पाहा व्हिडीओ

Updated: Jul 31, 2022, 05:50 PM IST
King Cobra: एकमेकांच्या जीवावर उठले कोब्रा, व्हिडीओ पाहताच भरेल धडकी title=

Snakes Fight Trending Video: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. यापैकी वन्य प्राण्यांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. सापांचे व्हिडीओ म्हटलं की नेटकऱ्यांचा जीव की प्राण असतो. नुसता साप दिसला तरी काही जणांची बोबडी वळते. तर काही जणांना सापांच्या विश्वाबद्दल कुतुहूल असतं.  साप राहतात कसे? त्यांचं भक्ष्य कसं करतात? याबाबत उत्सुकता असते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन कोब्रा सापांची झुंज पाहायला मिळत आहे. दोन साप मादी कोब्राला प्रभावित करण्यासाठी झुंज करत असल्याचं दिसत आहे. नेमकं कोण बाजी मारतं? याबाबत नेटकरी सोशल मीडियावर चर्चा करत आहेत.

मादी किंग कोब्राला प्रभावित करण्यासाठी दोघांमध्ये झुंज सुरू होते. दोघेही एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. अखेर सुमारे 4-5 तासांच्या या लढाईनंतर निर्णय होतो. एक कोब्रा आपला पराभव स्वीकारतो आणि जंगलात जातो. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने पसरत आहे. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हजारो लोकांनी व्हिडीओला लाईक देखील केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.