नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात मंगळवारी रात्री बर्फवृष्टी झाली. त्यामुळे साहजिकच दोन्ही राज्यात थंडीची चादर पसरली. त्याचबरोबर हलक्या पावसाच्या सरीही बरसल्या. कृषी तज्ञांनुसार, हलका पाऊस शेतीसाठी चांगला मानला जातो.
बर्फवृष्टीमुळे पर्यटक सुखावले. मात्र याचा परिणाम ट्रफीकवर झाला.
हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमला आणि आसपासच्या परिसरात बर्फवृष्टी झाली. काश्मिरच्या कारगीलमध्ये तापमान शून्य ते १९.२ डिग्री सेल्सियस पेक्षा कमी राहीले. लेहमध्ये पारा शून्य ते १४ डिग्रीच्या वर गेला नाही. श्रीनगरमध्ये शून्य ते ३.७ डिग्री सेल्सियसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली.
काश्मिरच्या दऱ्यांमध्ये बर्फवृष्टी आणि पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील उंचीवरच्या ठिकाणी आधीपासून थंडीचे वातावरण आहे.
राष्ट्रीय राजधानीत हलका पाऊस झाला. त्यामुळे वातावरण थंड झाले. मौसम विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, येथे कमीत कमी ९.४ डिग्री तापमानाची नोंद झाली. तर जास्तीत जास्त १७ डिग्री पर्यंत तापमान होते. सफदरजंग वेधशाळेने मंगळवारी संध्याकाळी साडे पाच वाजता ४.४ मिलीमीटर पावसाची नोंद केली.
तर पंजाब हरियाणात हलका पाऊस झाला. पंजाब अमृतसर, लुधियाना आणि पटियालात तापमान अनुक्रमे ६.७ डिग्री, ६.४ डिग्री आणि ९.६ डिग्री इतके तापमान होते. हरियाणाच्या अंबालात १०.२ डिग्री तापमान होते. पश्चिमी विक्षोभच्या कारणाने राजस्थानात हलकी पर्जनवृष्टी झाली. उत्तर प्रदेशातील फुरसतगंज ३.६ डिग्री तापमानासोबत राज्यात सर्वत्र थंडीचे वातावरण होते.