'सॉलिसिटर जनरल' रंजीत कुमार यांनी दिला पदाचा राजीनामा

वरिष्ठ अधिवक्ते रंजीत कुमार यांनी 'सॉलिसिटर जनरल' पदाचा राजीनामा दिलाय. 

Updated: Oct 20, 2017, 05:26 PM IST
'सॉलिसिटर जनरल' रंजीत कुमार यांनी दिला पदाचा राजीनामा  title=

नवी दिल्ली : वरिष्ठ अधिवक्ते रंजीत कुमार यांनी 'सॉलिसिटर जनरल' पदाचा राजीनामा दिलाय. 

सॉलिसिटर जनरल हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं वरिष्ठ कायदेशीर अधिकाराचं पद आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधि तसंच न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या कार्यालयाला आज रंजीत कुमार यांचं त्याग पत्र मिळालं... कथितरित्या 'खाजगी' कारणामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. 

मोदी सरकार सत्तेवर आरुढ झाल्यानंतर जून २०१४ मध्ये रंजीत कुमार यांना सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. नुकतंच, रंजीत कुमार यांनी याच पदावर आपला दुसरा कार्यकाळ सुरू केला होता. 

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी रंजीत कुमार यांच्या नावाचा विचार होत असल्याची चर्चा काही महिन्यांपूर्वी रंगली होती. 

नुकतंच, वरिष्ठ अधिवक्ते मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल पदाचा राजीनामा दिला. अॅटर्नी जनरल पदावर दुसऱ्या कार्यकाळासाठी आपण उत्सुक नसल्याचं कारण त्यांनी आपल्या राजीनाम्यात दिलं होतं. रोहतगी यांच्या राजीनाम्यानंतर वरिष्ठ अधिवक्ते के के वेणुगोपील यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली.