अश्लील Video बनवून मुलाकडून ब्लॅकमेलिंग! मित्रांबरोबर संबंध ठेवायला लावले; आरोपीच्या आईने सर्वांना व्हिडीओ...

मुलाने मित्रांसोबत तिच्यावर अतिप्रसंग केला आणि त्यानंतर मुलाच्या आईने तर हद्द पार केली. मुलाचा प्रताप कळूनही तिला शिक्षा करण्याऐवजी तिच्यावरील अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल करेल असं सांगून धमकी देत होती.  

Updated: Jun 1, 2024, 11:15 AM IST
अश्लील Video बनवून मुलाकडून ब्लॅकमेलिंग! मित्रांबरोबर संबंध ठेवायला लावले; आरोपीच्या आईने सर्वांना व्हिडीओ... title=
son and friends physical assault with girl make obscene video mother Blackmailing video-shows to people agra crime news

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला वस्तीतील एका तरुणाने सुन्नसान जागी भेटायला बोलवलं. त्यानंतर त्याचे काही मित्र तिथे आहे. त्या तरुणाने आणि त्याच्या मित्राने त्या मुलीवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. या प्रसंगाचा त्यांनी व्हिडीओ काढला. एवढंच नाही हा व्हिडीओ परिसरात दाखवणार हे म्हणून तिला आपल्याच घरी कामाला ठेवलं. धक्कादायक म्हणजे या मुलाच्या आईनेही तिला व्हिडीओ परिसरातील लोकांना दाखवेल, असं सांगून तिच्याकडून घरातील कामं करुन घेतली. या घटनेनंतर या अल्पवयीन मुलीने त्या घरात 8 महिने अत्याचार सहन केला. त्यानंतर तिने तिथून पळ काढला आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 

सदरच्या कँट परिसरात राहणाऱ्या या 16 वर्षीय मुलीने पोलिसांना सांगितलं की, तिच्या आईची तब्येत खराब असून ती घरात काम करून कुटुंब चालवत होती. आठ महिन्यांपूर्वी तिचा मित्र नितीन याने तिला अर्धबांधलेल्या सरकारी घरात भेटण्यासाठी बोलावलं. मग तिथे नितीनने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, परिसरातील रिजवान हा तरुण त्याच्या मित्रांसह तिथे आला. मुलीसोबत होणाऱ्या या अत्याचाराचा त्यांनी व्हिडीओ काढला. त्यानंतर तिला ब्लॅकमेल करत त्याच्या घरी काम करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरु केली. तिने घाबरून घर काम करण्यास होकार दिला. त्यानंतर त्या मुलाने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरु केली. त्यानंतर तिला धमकावून मित्रांशीही संबंध ठेवण्यास भाग पाडलं. काही आठवड्यांपूर्वी, तो तरुण नाराज झाला आणि त्याने तिला नोकरीवरुन काढण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीच्या आईने त्या मुलीचा व्हिडीओ संपूर्ण परिसरात दाखवला. आता ती त्या मुलीवर दबाव टाकत आहे की 20 हजार घेऊन प्रकरण संपवून टाक. 

दरम्यान मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू केली आहे. प्रभारी निरीक्षक प्रदीप कुमार यांनी तक्रारीची माहिती घेतली आहे. व्हिडीओ आणि फोन मेसेजच्या आधारे दोन्ही आरोपींची चौकशी सुरू करण्यात आली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे प्रदीप कुमार यांनी मीडिया रिपोर्टमध्ये सांगितलं.