आई महिन्याला 5 हजार कमवायची, मुलाने इंटरनेटच्या मदतीने बदलले आयुष्य, संघर्ष वाचून भावूक व्हाल

Trending News In Marathi: एका मुलाने आपल्या आईसाठी एक भावूक पोस्ट लिहली आहे. आईला आरामदायी आयुष्य मिळावे यासाठी त्याने केलेल कष्ट मनाला भावूक करणारे आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 8, 2024, 05:21 PM IST
 आई महिन्याला 5 हजार कमवायची, मुलाने इंटरनेटच्या मदतीने बदलले आयुष्य, संघर्ष वाचून भावूक व्हाल title=
son help mother to quit low pay job and live comfotably

Trending News In Marathi: जस जसा काळ बदलला आहे तसे करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. सुरुवातीला चांगला आभ्यास केला तरच चांगली नोकरी मिळायची असं म्हटलं जायचं. मात्र, जस जसा काळ बदलत गेला तसा आभ्यास आणि क्षेत्रही बदलत गेले. आता तुमच्या छंदानुसार तुम्ही करिअरही निवडू शकता. आजच्या घडीला तुमच्या कौशल्याला अधिक मागणी आहे. आता तुम्ही ऑनलाइन एखादी गोष्ट शिकून त्या माध्यमातून शिकूही शकत आहात. आयुष गोयल याचे उत्तम उदाहरण आहे. 

आयुष गोयल स्वतः एक अकाउंटेट आणि कॉपीरायटर आहे. ते त्यांच्या ग्राहकांसोबत ऑनलाइन काम करतात आणि त्यांच्या कॉपीरायटिंग स्कीलमुळं चांगली कमाईही करतात. ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्याने नेटवर्किंग आणि व्हिजिबिलिटी वाढवली आहे आणि स्वतःचा एक ब्रँड स्थापन केला आहे. ऑनलाइन काम करत असतानाच आयुषने अलीकडेच त्याच्या आईला आरामदायक आयुष्य देण्याचा निर्णय घेतला आहे. 

आयुषने ट्विटरवर लिहलं आहे की, अलीकडेच माझ्या आईने 5 हजारांची नोकरी फुल टाइम आई आणि पत्नी बनण्यासाठी सोडली आहे. मला आजही आठवतंय की आम्ही दोघ बाथरुममध्ये जाऊन खूप रडलो होते. कारण तेव्हा माझ्याकडे कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नव्हते ट्विटरने माझ्याबरोबरच माझ्या आईचे आयुष्यही बदलले आहे. मी माझ्या 764 मित्रांचा आभारी आहे. 

इतकंच नव्हे तर, एका छोट्याश्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आणि किचनमध्ये बसून काम करणाऱ्या आयुषने एक टू-बीएचके अपार्टमेंट खरेदी केले आहे. तिथेच त्याने त्याचे ऑफिस स्थापन केले आहे. आयुषने पुढे म्हटलं आहे की, मी सगळ्यात पहिले $1000 किचनमध्ये बसून काम करुन कमवले होते. आम्ही एका लहानशा घरातील खोलीत बसून काम करत होते. मात्र आता दोन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो आहोत. इथे ऑफिससाठी वेगळी जागापण आहे. मागचे 6 महिने खूप जास्त काम असणार आहेय तुम्हा सर्वांना खूप सारे प्रेम. 

आयुषची मेहनत आणि कष्टामुळं इंटरनेटवर त्याचे अनेकांनी कौतुक केले आहे. आयुषला भरभरुन प्रतिसाद देत आहेत. तर, त्याला पुढील वाटचालीसाठीही शुभेच्छा देत आहेत.