सासू असावी तर अशी! जावयाच्या ताटात वाढले 379 पदार्थ; मेजवानीचा थाट तुफान व्हायरल

Viral Video : सोशल मिडियावर एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यात जावयाच्या ताटात तब्बल 379 पदार्थ वाढवण्यात आले आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Aug 15, 2024, 04:31 PM IST
सासू असावी तर अशी! जावयाच्या ताटात वाढले 379 पदार्थ; मेजवानीचा थाट तुफान व्हायरल title=

Son in Law Viral Video : सासुरवाडीत आलेल्या जावयाचा थाड काही वेगळाच असतो. जावयाच्या खातीरदारीत सासुरवाडीतील मंडळी काहीच कमी पडू देत नाहीत. मानापाना सह जेवणातही जावयासाठी खास मेन्यू बनवले जातात आणि जावयाला आग्रहाने खायला घातले जातात. सोशल मिडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यात सासुरवाडीत जेवायला आलेल्या जावयाच्या ताटात चार पाच नाही तर तब्बल 379 पदार्थ वाढण्यात आले आहे.  टेबलावर असलेले पदार्थ पाहून नेटकरी चाट पडले आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये जे जोडपं दिसत आहे त्यांचा विवाह गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात झाला होता. लग्नानंतर  पहिल्यांदाच जावयाला सासरवाडीत मेजवानीचे निमंत्रण देण्यात आले होते. मकर संक्रांतीनिमित्ताने मुलीसह जावयाला घरी बोलावण्यात आले होते. सासुरवाडीत जावयासाठी खास जेवणाचा बेत ठेवण्यात आला होता. जावयाच्या ताटात चार पाच नाही तर  379 पदार्थ वाढण्यात आले होते.

379 पदार्थांनी जेवणाचा टेबल सजवण्यात आला होता. 40 प्रकारचा राईस,  20 प्रकारच्या रोटी आणि चटणी, 40 प्रकारच्या करी, 40 प्रकारचे तळलेले पदार्थ आणि पापड,  70 प्रकारच्या भाज्या,  पापड, लोणचं, डाळ या पारंपारिक पदार्थांसह 90 ते 100 प्रकारचे गोड पदार्थ देखील वाढण्यात आले होते. तसेच ताक, दही, चहा, कॉफी, ज्युस यासह विविध प्रकारचे पेय देखील ठेवण्यात आले. सासरच्या मंडळीनी जावयाला उचलून जेवण्याचा टेबलावर बसवले. प्रत्येक पदार्थ टेस्ट करावा असा आग्रह देखील करण्यात येत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by kusdhar (@kus_dhar)

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील गावातील असल्याचे समजते. kus_dhar and kusuma__rao या अकाऊंटवरुन इन्स्टाग्रामवर या राजेशाही मेजवानीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 16 January 2023 शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला लाखो vivews आले आहेत.  या व्हिडिओ 172,534 likes आले असून हजारोपक्षा जास्त कमेंट्स आल्या आहेत.