मोबाईलवर गेम खेळण पडलं महागात, कुटूंब आलं रस्त्यावर

गेम खेळता खेळता मुलाच्या वडिलांच्या खात्यातून सर्व रक्कम क्रेडिट झाल्याची घटना घडलीय. 

Updated: Jun 24, 2022, 03:40 PM IST
मोबाईलवर गेम खेळण पडलं महागात, कुटूंब आलं रस्त्यावर   title=

 नवी दिल्ली : प्रत्येक पालक त्याच्या मुलाला आपला फोन गेम खेळण्यासाठी देत असतो. या गेममध्ये आकंठ बुडून ही मुलं हे गेम खेळत असतात. या नादात त्यांना काय चाललंय, कोण काय करतंय, आपण कुठल बटण दाबतोय, याची काहीच माहीती नसते. असंचं गेम खेळता खेळता मुलाच्या वडिलांच्या खात्यातून सर्व रक्कम क्रेडिट झाल्याची घटना घडलीय. या घटनेने वडिलांना मोठा धक्का बसला असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलेय. 

आग्रातल्या एका कुटूंबातील लहान मुलगा मोबाईलवर सतत गेम खेळायचा. एके दिवशी असचं वडिलांच्या फोनवरून गेम खेळत असताना अचानक त्यांच्या बॅंक खात्यातून 39 लाख रूपये क्रेडीट झाल्याची घटना घडली. इतकी मोठी रक्कम खात्यातून अचानक काढली गेल्याने वडिलांच्या पायाखालची जमीनचं सरकली. या घटनेमुळे क्षर्णाधात आयुष्यभराची कमाई त्यांच्या हातातून गेली. त्यामुळे कुटूंब आर्थिक संकटात सापडले होते.
  
दरम्यान याप्रकरणी निवृत्त सैनिकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांनी म्हटले की, त्यांच्या खात्यातून 39 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. बँक खात्यातून एवढी मोठी रक्कम कशी गायब झाली हे त्यांना कळत नाहीये. याबाबत बँकेला विचारणा केली असता, पहिली रक्कम Paytm द्वारे ट्रान्सफर झाल्याचे आढळून आले, जी सिंगापूरमधील एका खात्यात पोहोचली. हे खाते कथितपणे क्राफ्टन कंपनीचे असल्याची माहिती आहे.  

आग्रा पोलिसांनी तपास केला असता बीजीएमआयची डेव्हलपर कंपनी क्रॉफ्टनचे नाव समोर आले आहे. यांच कंपनीच्या खात्यात हे पैसे ट्रान्सफर झाले आहेत.  वडिलांच्या तक्रारीवरून क्रॉफ्टन कंपनीविरुद्ध फसवणूक आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान तुमचाही मुलगा जर मोबाईलवर गेम खेळत असेल तर आताचं सावधान व्हा. मोबाईल मधले पेमेंट अॅप काढून टाका अन्यथा तुम्हालाही असा भुर्दंड बसण्याची शक्यता आहे.