सोनिया गांधी नववर्षासाठी गोव्यात, लुटला सायकलिंगचा आनंद

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी या नववर्षासाठी  गोव्यात दाखल झाल्या आहेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 28, 2017, 10:20 AM IST
सोनिया गांधी नववर्षासाठी गोव्यात, लुटला सायकलिंगचा आनंद title=

पणजी : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी या नववर्षासाठी  गोव्यात दाखल झाल्या आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्या दिल्लीत परतणार आहेत. दरम्यान, त्यांनी गोव्यात सायकल चालविण्याचा आनंद लुटला.

पक्ष कार्यक्रमापासून दूर 

सोनिया गांधी या दक्षिण गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरल्या आहेत. आपल्या सुट्टी दरम्यान त्या याच हॉटेलमध्ये थांबणार आहेत.काँग्रेस अध्यक्ष पदाची कमान राहुल गांधी यांच्याकडे सोपविल्यानंतर त्या प्रथमच गोव्यात सुट्टीवर आल्या आहेत. काँग्रेस पक्ष कार्यक्रम आणि काँग्रेस नेते यांच्यापासून त्यांनी दूर राहणे पसंत केले आहे.

हॉटेल परिसरात सायकलिंग

सोनिया गांधी यांनी येथील हॉटेल परिसरात सायकलिंगचा आनंद लुटला. त्यांच्यासोबत खासगी सुरक्षा रक्षक आहेत. दरम्यान, पोलीस आणि हॉटेल प्रशासनाने त्यांच्याबात अधिक माहिती देण्यास नकार दिलाय. दरम्यान, त्यांच्यासोबत काहींनी सेल्फी काढला. सोनिया गांधी यांनी यावेळी कोणाला निराश केले नाही. त्यांना सेल्फी घेऊ दिला.