राहुल अध्यक्षपदी आल्यानंतर, सोनियांचं वक्तव्य, 'मी निवृत्त होतेय'

तेव्हा सोनिया गांधी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले, अर्थात हे प्रश्न राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर होते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 15, 2017, 12:46 PM IST
राहुल अध्यक्षपदी आल्यानंतर, सोनियांचं वक्तव्य, 'मी निवृत्त होतेय' title=

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे, आज जेव्हा सोनिया गांधी संसदेत प्रवेश करत होत्या, तेव्हा सोनिया गांधी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले, अर्थात हे प्रश्न राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर होते.

सोनिया गांधींनी दिलं हे उत्तर

सोनिया गांधी यांना प्रवेशद्वारात रोखत पत्रकारांनी विचारलं, तुमची आता पक्षातील भूमिका काय?, यावर सोनिया गांधी यांनी उत्तर दिलंय, रिटायर्ड होणार आहे. (मै रिटायर्ड हो रही हूँ)

सोनिया गांधी यांचं वक्तव्य महत्वाचं

सोनिया गांधी यांची प्रकृती अनेक वेळा बिघडली होती. राहुल गांधी यांनी ऑफिशियली काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर एका दिवसाच्या आड सोनिया गांधी यांची ही प्रतिक्रिया महत्वाची मानली जात आहे.

आता सल्लागार सोनिया गांधी?

सोनिया गांधी यांनी ९ डिसेंबर रोजी ७१ व्या वर्षात पदार्पण केलं. १९ वर्षे त्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी होत्या. अर्थात सोनिया गांधी या मी रिटायर्ड झाल्याचं म्हणत असल्या, तरी पक्षाच्या सल्लागार म्हणून त्या कायम असतील असं, राजकीय जाणकारांनी म्हटलं आहे.