Uttar Pradesh crime : विरोधकाच्या तरुण मुलीला घेऊन भाजप नेता (BJP Leader) फरार झाला आहे. उत्तर प्रदेशात ही धक्कादायक घटना घडली आहे (shocking news). विशेष म्हणजे या मुलीचे लग्न ठरले होते. तर, ही मुलगी ज्या भाजप नेत्यासह पळून गेली तो 21 वर्षाच्या मुलाचा बाप आहे. भाजप नेत्याचे या मुलीसह विवाहबाह्य संबध (Extramarital Affairs) होते. या घटनेमुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे (Uttar Pradesh crime).
आशिष शुक्ला असे या भाजप नेत्याचे नाव आहे. शुक्ला हा भाजपचा शहर सरचिटणीस आहे. शुक्ला याच्यावर सपा नेत्याच्या 26 वर्षाच्या तरुण मुलीचे अपहरण केल्याचा आरोप आहे. शुक्ला हा 47 वर्षांचा आहे. शुक्ला हा विवाहित असून त्याला 21 वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी असल्याचीही धक्कादायक बाब समोर आली आहे.
13 जानेवारी रोजी शुक्ला हा सपा नेत्याच्या मुलीला घेऊन फरार झाला आहे. लग्नाचे आमीष दाखवून शुक्ला याने आपल्या मुलीचे अपहरण केल्याचा दावा सपा नेत्याने केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शुक्ला आणि सपा नेत्याच्या मुलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध असल्याची चर्चा सुरु होती. ही बाब कुटुंबियांना समजली. कुटुंबियांनी शुक्ला याला समज दिली. यानंतर कुटुंबियंनी संबंधित तरुणीचे लग्न दुसरीकडे ठरवले होते. मात्र, लग्नाआधीच ही तरुणी आशिष शुक्लासह फरारा झाली आहे.
यानंतर सपा नेत्याने आक्रमक भूमिका घेतली. मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत समाजवादी पक्षाने भाजपवर निशाणा साधला आहे. सपा कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपच्या राजवटीत मुली सुरक्षित नसल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटल आहे.
आशिष शुक्लाने त्याची पत्नी, 21 वर्षीय मुलगा आणि 7 वर्षाच्या मुलीचा विचार न करता आपल्या संपूर्ण कुटुंबालाचा वाऱ्यावर सोडले आहे. कुटुंबाची पर्वा न करत शुक्ला याने मुलीला फूस लावून घरातून पळवून नेल्याचा सपा नेत्याने तक्रारीत म्हंटले आहे.
दरम्यान, हा सर्व प्रकार उघडकीस येताच भाजप पत्राने सावध भूमिका घेतली. पक्षाची बदनामी झाल्याच्या कारणास्तव भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी शुक्लाची पक्षातून हकालपट्टी केली आहे. शुक्ला याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.