अयोध्या : डिसेंबर १९९२मध्ये बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात आज भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांसहीत १२ जणांविरोधात सुनावणी झाली. यावेळी, कोर्टानं सर्व आरोपींना जामीन मंजूर केलेत.
२० हजारांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर या सर्व आरोपींना जामीन मंजूर करण्यात आलाय. स्पेशल सीबीआय कोर्टानं हा जामीन मंजूर केलाय.
लखनऊमधील विशेष कोर्टात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या सुनावणीला सर्व आरोपींना हजर राहण्याचे आदेश कोर्टानं दिले होते. त्यानुसार आज अडवाणी आणि जोशी यांच्यासह १२ बडे नेते लखनौ न्यायालयात हजर झाले होते.
याप्रकरणी एकूण १७ आरोपी आहेत. त्यापैंकी पाच आरोपींची सुनावणी गेल्या ११ तारखेपासून सुरू झालेल्या सुनावणीत घेण्यात आली. आज एकूण १२ जणांना जामीन मंजूर करण्यात आलाय.