नवी दिल्ली : आज देशभरातली औषधांची दुकानं बंद राहणार आहेत. औषध विक्रीसंदर्भात करण्यात आलेल्या निर्बंधांच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आलाय. औषध विक्रीसंदर्भातली सगळी सविस्तर माहिती एका पोर्टलवर अपडेट करणं मेडिकल दुकानांना बंधनकारक करण्यात आलं आहे.
तसंच औषध विक्रेत्यांना दिलं जाणारं कमिशन, यासंदर्भातही नवे नियम तयार करण्यात आले आहेत. या सगळ्या नियमांसंदर्भात केमिस्ट असोसिएशननं सरकारकडे निषेध व्यक्त केला होता. पण सरकारकडून काहीच प्रतिसाद न आल्यानं आज एक दिवस सगळी औषधांची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.