पाकिस्तानी संसदेत हिंदू खासदाराची केली मस्करी, मिळालं हे उत्तर

पाकिस्तानी संसदेत एका हिंदू खासदाराची मस्करी केलेल्यांना कठोर शब्दात प्रतिउत्तर मिळालं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. पाकिस्तानी विधानसभेत हिंदू सदस्य लाल चंद माल्ही याबाबत भरपूर नाराज आहेत. पाकिस्तानी खासदारांनी त्यांना 'गाईचा पुजारी' असं 'हिंदू हिंदू' म्हणत संबोधलं आहे. माल्हीने बजट सत्राच्या दरम्यान याला विरोध केला आहे. हा व्हिडिओ गेल्यावर्षी जूनचा आहे. 

Dakshata Thasale Updated: Mar 26, 2018, 04:37 PM IST
पाकिस्तानी संसदेत हिंदू खासदाराची केली मस्करी, मिळालं हे उत्तर  title=

इस्लामाबाद : पाकिस्तानी संसदेत एका हिंदू खासदाराची मस्करी केलेल्यांना कठोर शब्दात प्रतिउत्तर मिळालं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. पाकिस्तानी विधानसभेत हिंदू सदस्य लाल चंद माल्ही याबाबत भरपूर नाराज आहेत. पाकिस्तानी खासदारांनी त्यांना 'गाईचा पुजारी' असं 'हिंदू हिंदू' म्हणत संबोधलं आहे. माल्हीने बजट सत्राच्या दरम्यान याला विरोध केला आहे. हा व्हिडिओ गेल्यावर्षी जूनचा आहे. 

माल्ही यांनी स्पिकर यांना सांगितले की, मी ऐकून गोंधळलो की खासदार जमशेद जस्ती आणि माजी पीएम मीर जफुरल्ला खान जमाली यांनी म्हटले की, हिंदू गाईची पूजा करतात. एवढंच नाही तर स्पीकर त्यांना बसण्याची विनंती करूनही त्यांना सर्व नियम तोडले आहेत. 

आम्ही तर पाकिस्तानी आहोत 

माल्ही यांनी बजेट सादर करताना म्हटलं की, गेले कित्येक दिवसांपासून मी पाहत आहे. असं म्हटलं जातं की हिंदू गाईची पूजा करतात. त्यांनी म्हटलं की, गाईची पूजा करणं हा आमचा हक्का आहे. आम्ही ते करणारच हिंदू हिंदू बोलून मला लतीफे लावू नका. 

आपलं काम सोडून हिंदूंना शिव्या देतात खासदार 

तसेच त्यांनी सांगितले की, संसदेत महत्वाच्या गोष्टींवर चर्चा होत नाही. मात्र हिंदूंना चिढवण्याचं काम मात्र नक्की होतं. खासदारांना फटका देताना माल्ही यांनी सांगितलं की, शिव्या भारताला द्यायच्या असतात पण हिंदूंना दिल्या जातात. अखेर आमची चूक काय असा प्रश्न त्यांनी विचारला?