SBI खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; तुमची FD असेल तर लवकरच व्हाल मालामाल

State Bank of India FD Hike: तुम्हीही जर का स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India Fixed Deposit) एफडी काढली असेल तर तुम्हाला त्यावर चांगल्या टक्क्यांमध्ये तुम्हाला व्याजदर मिळू शकते. 

Updated: Feb 15, 2023, 06:04 PM IST
SBI खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी;  तुमची FD असेल तर लवकरच व्हाल मालामाल  title=

State Bank of India FD Hike: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं गेल्या अनेक महिन्यांमध्ये रेपो रेटमध्ये (Repo Rate) वारंवार वाढ केली आहे. आरबीआयच्या पतधोरणाच्या बैठकाही अनेकदा होताना दिसत आहेत. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातही आरबीयआयकडून (RBI) मोठ्या प्रमाणात रेपो रेट्समध्ये दरवाढ करण्यात आली होती. नुकतीच फेब्रुवारीतही आरबीआयकडून रेपो रेटमध्ये (RBI Repo Rate Hike) 0.25 टक्क्यांनी वाढ केली होती त्यामुळे साहजिकच व्याजदरात वाढ झाली आहे आणि EMI धारकांनाही जास्तीचा ईएमआय (EMI) भरावा लागणार आहे. परंतु अशा परिस्थिती तुम्हाला एक गुड न्यूजही आहे. त्यातून स्टेट बॅंक ऑफ इंडियानंही आपल्या फिक्स्ड डिपॉजिटमध्येही वाढ केली आहे. 0.25 बेसिस पॉईंट्सपर्यंत ही व्याजदर वाढविली आहे. 

15 फेब्रुवारीपासून ही एफडी व्याजदर वाढ झाली आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियानं 2 करोडपर्यंत आपले एफडी रेड्स वाढवले आहेत. तेव्हा जाणून घेऊया की येत्या काळातील बदलानंतर स्टेट बॅंक ऑफ इंडियानं (State Bank of India) एफडीत वाढ केली आहे. 

सध्या अख्ख्या जगात मंदीचे वातावरण घोंगावताना दिसते आहेत. त्यामुळे मोठ मोठ्या महत्त्वाच्या बॅंकांनी आपले व्याजदर वाढवायला सुरूवात केली आहे. त्यातून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवरही रेपो रेट वाढविण्याकडे बॅंकांचा कल आहे. अमेरिकेच्या फडरल रिझर्व्हनंही (Federal Reserve) कडक कारवाई सुरू केली आहे. त्याचबरोबर भारतातही सहा-सातवेळा भारतीय रिझर्व्ह बॅंकेनं व्याजदर वाढ केली आहे. त्यातून आता महागाई नियंत्रणात येत असल्याची चिन्ह दिसायला ही लागली आहे. 

स्टेट बॅंक ऑफ इंडियानं खालीलप्रमाणे वाढ केली आहे - 

1. 7 ते 45 दिवसांपर्यंत - 3 टक्के 
46 ते 179 दिवसांपर्यंत - 4.5 टक्के 
180 ते 210 दिवसापर्यंत - 5.25 टक्के 
211 ते 1 वर्षांपर्यंत - 5.75 टक्के 
1 ते 2 वर्षांपर्यंत - 6.80 टक्के 
2 ते 3 वर्षांपर्यंत - 7.00 टक्के 
3 ते 5 वर्षांपर्यंत - 6.50 टक्के 
5 ते 10 वर्षांपर्यंत - 6.50 टक्के

तुम्हीही जर का स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India Fixed Deposit) एफडी काढली असेल तर तुम्हाला त्यावर चांगल्या टक्क्यांमध्ये तुम्हाला व्याजदर मिळू शकते. जर का तुम्ही स्टेट बॅंक ऑफ इंडियातून एफडी काढली नसेल तर तुम्ही नक्कीच एफडी काढू शकता. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावरून तुम्हाला याबद्दल अधिक माहिती मिळू शकते. सध्याच्या महागाईच्या वाढत्या संकटांत आपल्याला गुंतवणूकीचीही फार मोठी गरज असते तेव्हा स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एफडीतून तुम्ही चांगली गुंतवणूक करू शकाल.