Stock Market | अदानी एंटरप्रायजेसच्या शेअर्सची दमदार उसळी; ट्रेडर्स झाले मालामाल

आज अदानीच्या शेअरची किंमत 1,065.00 रुपये इतकी झाली आहे.

Updated: Mar 23, 2021, 03:13 PM IST
Stock Market | अदानी एंटरप्रायजेसच्या शेअर्सची दमदार उसळी; ट्रेडर्स झाले मालामाल title=

मुंबई : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE)मध्ये सकाळच्या सत्रात अदानी एंटरप्रायजेसच्या शेअरने सुमारे 10 टक्क्यांची  उसळी घेतली. आज अदानीच्या शेअरची किंमत 1,065.00 रुपये इतकी झाली आहे.
 
कंपनीने आपल्या सहकंपनी असलेल्या अदानी रोड ट्रान्सपोर्ट लिमिटेडने Gujarat under Toll Operate Transfer (TOT)  अंतर्गत प्रकल्प सुरू केल्याची घोषणा 19 मार्चपासून केली आहे.
 
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने अदानी एंटरप्राईजेस बरोबर नेक्स्टचेम आणि स्टॅमिक कार्बन कंपन्यांसोबत ग्रीन फिल्ड प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केला आहे. 
 
यामुळे कंपनीला आगामी काळात चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे आज अदानी एंटरप्राईजेसच्या शेअर्सने चांगली उसळी घेतलेली दिसून आली.