Stock Market : घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 315 अंकांनी वधारला, तर निफ्टी 111 अंकांनी वधारला

 शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटांतच तेजी असल्याचे दिसून आले. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 348 अंकांनी वधारत 59,151.47 अंकावर व्यवहार सुरू होता.

Updated: Sep 5, 2022, 10:46 AM IST
Stock Market : घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 315 अंकांनी वधारला,  तर निफ्टी 111 अंकांनी वधारला title=

Stock Market Update : जागतिक बाजारातील कमकुवत परिणामांमुळे आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजार संमिश्र ट्रेंडसह उघडला. दरम्यान  शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटांतच तेजी असल्याचे दिसून आले. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 348 अंकांनी वधारत 59,151.47 अंकावर व्यवहार सुरू होता. निफ्टी 111 अंकांच्या तेजीसह 17,625.55 अंकांवर व्यवहार करत होता.  

निफ्टीचे टॉप गेनर्स आणि टॉप लॉजर्स
बाजार उघडल्यानंतर काही वेळातच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाली. सकाळी 9.30 च्या सुमारास सेन्सेक्स 218 अंकांनी वर चढला आणि 59 हजारांचा टप्पा पार केला. त्याच वेळी, निफ्टी 45 ​​अंकांच्या वाढीसह 17,584 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. हिंडाल्को, जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी, अदानी पोर्ट्स आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स निफ्टीच्या टॉप गेनर्समध्ये दिसले. दुसरीकडे, नेस्ले इंडिया, डिव्हिस लॅब, महिंद्रा अँड महिंद्रा, अपोलो हॉस्पिटल आणि पॉवर ग्रिड हे सर्वाधिक घसरले.

वाचा : पहिल्या सामन्यात Hero, दुसऱ्या सामन्यात Zero; 'या' पाच जणांमुळे भारताचा पराभव

जागतिक बाजारपेठेत घसरण
दुसरीकडे, जागतिक बाजारातून पुन्हा एकदा कमजोर संकेत मिळत आहेत. शुक्रवारी डाऊ जोन्सने 340 अंकांची मोडतोड केली. येथे ऑगस्टमध्ये बेरोजगारीचा दर 3.5% वरून 3.7% पर्यंत वाढला आहे. त्यामुळे शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारी, SGX निफ्टी 50 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. ओपेकच्या आज होणाऱ्या बैठकीत कच्च्या तेलाच्या उत्पादनावर लक्ष ठेवले जाणार आहे. ओपेकच्या बैठकीपूर्वी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 95 च्या जवळ गेला.

शुक्रवारी शेअर बाजाराची स्थिती
याआधी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी (2 सप्टेंबर) बीएसई सेन्सेक्स अस्थिरतेच्या दरम्यान 37 अंकांनी वर गेला होता. व्यवहाराच्या सत्राअखेर बीएसईचा 30 समभाग असलेला सेन्सेक्स 36.74 अंकांच्या वाढीसह 58,803.33 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 3.35 अंकांनी घसरून 17,539.45 अंकांवर बंद झाला.