Buy, Sell or Hold | मोठ्या घसरणीनंतर IRCTC, Mastek आणि Bata India च्या गुंतवणूकदारांनी काय करावं?

IRCTC चा शेअर तब्बल 17 टक्क्यांनी घसरल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला

Updated: Oct 21, 2021, 10:06 AM IST
Buy, Sell or Hold | मोठ्या घसरणीनंतर IRCTC, Mastek आणि Bata India च्या गुंतवणूकदारांनी काय करावं?

मुंबई : भारतीय शेअर बाजारात सलग दोन दिवस घसरण दिसून आली. मंदी करणाऱ्या गुंतवणूकदारांनी बेंचमार्क इंडेक्सला क्रुशिएल सपोर्ट लेवलच्या खाली ढकलले. NIFTY 18,300 खाली बंद झाला. दरम्यान BSE चा सेंसेक्स 450 पेक्षा अधिक अंकांनी घसरला. 

मिड आणि स्मॉलकॅप इंडेक्सचीही घसरण झाल्याने मिड कॅप इंडेक्स साधारण 2 टक्क्यांनी घसरला होता. परंतु मार्केटच्या घसरणीमध्ये IRCTC चा शेअर तब्बल 17 टक्क्यांनी घसरल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. तसेच मास्टेक (Mastek)चा शेअर 13 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. बाटा इंडियाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक असणाऱ्यांचेही नुकसान झाले आहे. 

स्वस्तिक इन्वेस्टमार्ट लिमिटेडचे रिसर्च हेड संतोष मीना यांनी या शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे.

IRCTC : Hold
IRCTCने आपला 6396 चा उच्चांकी आकडा गाठला होता. मागील दोन ट्रेंडिंग सेशनमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी म्हणजेच 30 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. 
 या शेअर्सचे फंडामेंटल्स मजबूत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या शेअर्स बाबतीत गुंतवणूकदारांमध्ये उत्साह होता.  परंतु मार्केट एवढ्या सहजपणे गुंतवणूकदारांना पैसा मिळवून देत नाही. 
 टेक्निकली हा शेअर 4400 च्या सपोर्ट झोनवर कायम राहिल्यास पुन्हा उच्चांकी गाठू शकतो. अन्यथा शेअरमध्ये आणखी घसरण होऊन 4000 ते 3800 रुपयांपर्यंतचा स्तर गाठू शकतो.
 
 Mastek : Hold
 मास्टेकमध्ये गेल्या वर्षभरापासून मोठी तेजी दिसून आली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये शेअर 350 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत होता. तर ऑगस्ट 2021 मध्ये या शेअरची किंमत 3000 रुपयांवर पोहचला आहे. 
 मार्केटच्या कालच्या पडझडीचा फटका मास्टेकला देखील बसला. मास्टेक साठी 2850-2750 चा स्तर मोठा डिमांड झोन आहे.याखाली शेअर घसरल्यास 2350-2250 चा पुढील सपोर्ट झोन असणार आहे. तर 2750 च्या वर शेअर कायम राहिल्यास पुढील दिवसांमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे 

 
 Bata India: Hold
 बाटा इंडिया एक मजबूत बुलिश मोमेंटम असलेला शेअर आहे. मोठ्या उच्चांकीनंतर शेअरमध्ये नफ्याची बुकिंग पहायला मिळाली. एक्सपर्टने या शेअरसाठी काही दिवस होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.