मुंबई : बाजारात 4 दिवस मंदीनंतर पुन्हा मंगळवारी तेजी दिसून आली. मेटल, पॉवर, युटिलिटीज आणि रियल्टी शेअर्समध्ये खरेदी तर आयटी क्षेत्रात विक्री नोंदवली आली.
भारतीय शेअर बाजारात चार दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी वाढ दिसून आली. BSE सेन्सेक्समध्ये 200 अंकांची वाढ तर NIfty50 देखील 17500 स्तराच्या पुढे आले आहे.
या शेअर्समध्ये चांगली वाढ
मंगळवारी शेअरबाजारात 300 शेअर्सची लक्षणीय वाढ झाली. Tanla Platformsमध्ये 5 टक्के वाढ झाली. JSW Energyमध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, रेमंडमध्ये 16 टक्क्यांनी वाढ झाली.
गुंतवणूकदारांनी काय करावे
कॅपिटलविया ग्लोबल रिसर्च लिमिटेडचे टेक्निकल रिसर्च प्रमुख विजय धनोटिया यांनी गुंतवणूकदारांना या तीन शेअर्सवर सल्ला दिला आहे. या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या तज्ज्ञांचे मत...
Tanla Platforms: Avoid
तन्ला प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक टाळण्याचा सल्ला तज्ज्ञ विजय धनोटिया यांनी दिला आहे. ते म्हणतात की, शेअरमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त तेजी आली आहे. मात्र, ही तेजी येत्या सत्रात थांबू शकते.
JSW एनर्जी : Buy
धनोटिया यांनी JSW एनर्जीवर खरेदीचा सल्ला दिला आहे. ते म्हणतात की, स्टॉकमध्ये सध्याच्या स्तरावरून तेजी दिसू शकते. शेअरमध्ये 310 रुपयांच्या आसपास खरेदी करून 400 चे टार्गेट आणि स्टॉप लॉस 275 च्या खाली ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
Raymond: Buy
या शेअरमध्ये तेजीची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे शेअर 540 रुपयांच्या आसपास खरेदी करून 650 रुपयांचे टार्गेट ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.