मुंबई : शेअर बाजारात अनेक दमदार स्टॉक आहेत ज्यांनी फक्त वर्षभरात गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. असाच एक शेअर म्हणजे जेएसडब्लू एनर्जी (JSW Energy)होय. या शेअरने गेल्या वर्षभरात 450 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. दरम्यान शेअरचा भाव 60 रुपयांवरून 333 रुपयांवर ट्रेड करीत आहे. या वर्षात शेअरने 398 हून अधिक अंकाची उंच्चांकी गाठली आहे. कंपनीच्या आर्थिक निकालांबाबत पाहिले तर, सप्टेबंर तिमाहीमध्ये कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये 3.7 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. परंतु कंपनीचा महसुल 12 टक्क्यांनी वाढला आहे.
जेएसडब्लू एनर्जी : 1 वर्षात 450 टक्क्यांहून जास्त रिटर्न
जेएसडब्लू एनर्जीचा गेल्या वर्षभरातील परताव्याचे चार्ट पाहिल्यास कंपनीचा शेअर सर्वाधिक रिटर्न देणाऱ्या स्टॉक्समध्ये सामिल आहे. मागिल वर्षभरात जेएसडब्लू एनर्जीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 450 टक्क्यांहून अधिकचा रिटर्न दिला आहे. म्हणजेच गुंतवणूकीत 4.5 पट वृद्धी झाली आहे. या दरम्यान शेअरचा भाव 60 रुपयांवरून 333 रुपयांवर ट्रेड करीत आहे.
ICICI सेक्युरिटीजचा विक्रीचा सल्ला
आयसीआयसीआय सेक्युरिटीजने स्टॉकसाठी 150 रुपयांच्या टार्गेटसह विक्रीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पावर बिझनेसच्या या कंपनीची कमिशनिंग क्षमता चांगली आहे. कंपनी आपल्या एस्सेटचा चांगला वापर करीत आहे.