Stock in News | तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर 'या' शेअर्सची गुंतवणूकदारांमध्ये चर्चा

stocks in news today : शेअर बाजारात तुम्हीही थेट गुंतवणूक करू शकता. त्यासाठी बातम्यांच्या आधारावर कोणते शेअर दिवसभरात ऍक्शनमध्ये असू शकतील याचा अंदाज तुम्हाला असायला हवा. त्यामुळे योग्य शेअरची निवड करून ट्रेडिंग केल्यास नक्कीच चांगला परतावा मिळवता येतो.

Updated: Jan 18, 2022, 09:14 AM IST
Stock in News | तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर 'या' शेअर्सची गुंतवणूकदारांमध्ये चर्चा title=

मुंबई :  शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी योग्य शेअरची निवड करणे गरजेचे असते. शेअर निवडण्यासाठी त्यासाठीचे महत्वाच्या टिगर्सचा अभ्यास असावा लागतो. अनेकवेळा गुंतवणूक सल्लागार आपल्याला योग्य शेअरची निवड करून देतात. त्याआधारावर आपण गुंतवणूकीचे धोरण निश्चित करीत असतो. 

शेअर बाजारात तुम्हीही थेट गुंतवणूक करू शकता. त्यासाठी बातम्यांच्या आधारावर कोणते शेअर दिवसभरात ऍक्शनमध्ये असू शकतील याचा अंदाज तुम्हाला असायला हवा. त्यामुळे योग्य शेअरची निवड करून ट्रेडिंग केल्यास नक्कीच चांगला परतावा मिळवता येतो.

त्यामुळे बातम्यांच्या आधारावार आज दिवसभरात कोणत्या कंपन्यांचे शेअर ऍक्शनमध्ये असू शकतात. हे पाहूया

मार्केटमधील आजचे महत्वाचे टिगर्स

Bajaj Finance चे तिमाही निकाल आज जाहीर होणार आहेत. सायंकाळी ICICI Lombard, L&T tech चे निकाल देखील जारी होतील.

GHCL च्या शेअरमध्ये ऍक्शन दिसू शकते. टेक्सटाइल बिझनेसच्या डीमर्जरबाबत आज सुनावणी आहे.

Ramkrishna Forg च्या शेअरवर गुंतवणूकदारांची नजर असेल. कारण शेअरच्या विभाजनावर आज कंपनीच्या बोर्डाची बैठक होणार आहे.

Shalimar Paints च्या शेअरवर ट्रेडर्स नजर ठेवतील, कारण मोठे भांडवल उभे करण्यासाठी कंपनीच्या बोर्डाची आज बैठक होणार आहे.

Talbros Engineering च्या शेअरमध्ये ऍक्शन दिसू शकते. कंपनीची प्राइस बॅंड 10 टक्क्यांनी कमी करून 5 टक्के करण्यात आली आहे.

Adani Gas Energy च्या शेअरवर गुंतवणूकदारांची नजर असणार आहे. कंपनीची प्राइस बॅंड 10 टक्क्यांनी कमी करून 5 टक्के करण्यात आली आहे.

Tatvchintan Pharma चे तिमाही निकाल समोर आले आहेत. कंपनीच्या उत्पन्नात तसेच नफ्यात वाढ दिसून आली आहे. 

Tata Steel Long च्या शेअर्समध्ये ऍक्शन दिसू शकते. कंपनीचे तिमाही निकाल निराशाजनक राहिले आहेत. कंपनीच्या नफ्यामध्ये 66 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

Angel One चे तिमाही निकाल सकारात्मक आहेत. कंपनीच्या एकूण उत्पन्नात वाढ झाली आहे.

tech Mahindra च्या शेअरमध्ये ऍक्शन दिसू शकते. 3 कंपन्याचे अधिकग्रहन करण्यासाठी बोर्डाची मंजूरी मिळाली आहे.

Tata Power च्या शेअर्समध्ये ऍक्शन दिसून येत आहे. कंपनी प्रयागराज आणि बांदा येथे 50 मेगावॅटचा सोलर प्लांट सुरू करणार आहे.