Stocks to Buy | मंदीतही भरघोस कमाईची संधी; 'या' 5 स्टॉक्सवर गुंतवणूकीचा एक्सपर्ट्सचा सल्ला

. बाजारातील या सततच्या अस्थिरतेच्या काळातही अनेक शेअर्स गुंतवणूकीसाठी उत्तम पातळीवर आहेत. उत्तम व्यावसायिक दृष्टीकोन लक्षात घेऊन ब्रोकरेज हाऊसनी काही शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किंमतीपासून 27 टक्क्यांपर्यंत भरघोस परतावा मिळू जाऊ शकतो.

Updated: Jul 7, 2022, 03:33 PM IST
Stocks to Buy | मंदीतही भरघोस कमाईची संधी; 'या' 5 स्टॉक्सवर गुंतवणूकीचा एक्सपर्ट्सचा सल्ला title=

मुंबई : जगभरातील बाजारपेठांमध्ये चढ-उतार होत आहेत. त्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावरही दिसून येत आहे. बाजारातील या सततच्या अस्थिरतेच्या काळातही अनेक शेअर्स गुंतवणूकीसाठी उत्तम पातळीवर आहेत. उत्तम व्यावसायिक दृष्टीकोन लक्षात घेऊन ब्रोकरेज हाऊसनी काही शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किंमतीपासून 27 टक्क्यांपर्यंत भरघोस परतावा मिळू जाऊ शकतो.

Marico Limited

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी मॅरिकोच्या स्टॉकवर खरेदीचा सल्ला दिला आहे. प्रति शेअर लक्ष्य किंमत 600 रुपये आहे. 6 जुलै 2022 रोजी शेअरची किंमत 500 रुपये होती. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांना प्रति शेअर 100 रुपये किंवा पुढे जाऊन सुमारे 20 टक्के परतावा मिळू शकतो.

Carborundum Universal Ltd

शेअरखानने कार्बोरंडम युनिव्हर्सलच्या स्टॉकवर खरेदीचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य किंमत रु. 952 आहे. 6 जुलै 2022 रोजी शेअरची किंमत 752 रुपये होती. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांना प्रति शेअर 200 रुपये किंवा पुढे जाऊन सुमारे 27 टक्के परतावा मिळू शकतो.

Tata Power

आयसीआयसीआय सिक्युरिटीजने 3 महिन्यांच्या दृष्टीकोनातून टाटा पॉवरच्या स्टॉकमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. प्रति शेअर लक्ष्य किंमत रु. 252 (स्टॉप लॉस - 190) आहे. 6 जुलै 2022 रोजी शेअरची किंमत 214 रुपये होती. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना प्रति शेअर 38 रुपये किंवा पुढे जाऊन सुमारे 18 टक्के परतावा मिळू शकतो.

Torrent Pharmaceuticals Ltd

ICICI सिक्युरिटीजने 3 महिन्यांच्या दृष्टीकोनातून टोरेंट फार्माच्या स्टॉकमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. प्रति शेअर लक्ष्य किंमत रु. 3250 आहे (स्टॉप लॉस - 2659). 6 जुलै 2022 रोजी शेअरची किंमत 2,900 रुपये होती. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांना प्रति शेअर 250 रुपये किंवा पुढे जाऊन सुमारे 12 टक्के परतावा मिळू शकतो.

HDFC Bank Limited 

बीएनपी परिबाने एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. प्रति शेअर लक्ष्य किंमत रु. 1710 आहे. 6 जुलै 2022 रोजी शेअरची किंमत 1,371 रुपये होती. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांना प्रति शेअर 339 रुपये किंवा पुढे जाऊन सुमारे 25 टक्के परतावा मिळू शकतो.