Fire Cracker चेंडूवर बॅट्समनचा स्ट्रेट ड्राईव्ह; बॉलरची पळापळ! मजेशीर Video सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही जण आपल्या कृतीने हसण्यास भाग पाडतात. दिवाळीपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिकेट आणि दिवाळी याचं एकत्रित प्रदर्शन या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

Updated: Oct 13, 2022, 07:15 PM IST
Fire Cracker चेंडूवर बॅट्समनचा स्ट्रेट ड्राईव्ह; बॉलरची पळापळ! मजेशीर Video सोशल मीडियावर व्हायरल title=

Diwali Fire Cracker Cricket Video Viral On Social Media: सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही जण आपल्या कृतीने हसण्यास भाग पाडतात. दिवाळीपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिकेट आणि दिवाळी याचं एकत्रित प्रदर्शन या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 8 सेकंदाच्या व्हिडीओमुळे तुम्ही नक्कीच पोट धरून हसाल. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 

व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती फटक्याची वात पेटवून फलंदाजी करणाऱ्या व्यक्तीकडे फेकतो. ती व्यक्ती फटका बरोबर पट्ट्यात घेत स्टेट ड्राईव्ह करतो. त्यामुळे गोलंदाजी करणारी व्यक्तीची काय करू आणि काय नको अशी स्थिती होते. गोलंदाज पळ काढतो तितक्यात फटका फुटतो. सुदैवाने कोणतीही इजा होत नाही. पुणेरी स्पिक्स नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

एका युजर्सनं लिहिलं आहे की, 'वेळीच पळून गेला नशिब, नाहितर वाटच लागली आहे.' दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, 'असं क्रिकेट सुरु झालं तर मैदानात सामने पाहायला जायलाच नको'. या व्हिडीओखाली कमेंट्स आणि लाईक्स वर्षाव सुरु आहे. पण हा व्हिडीओ नेमका कुठचा आहे कळू शकलेलं नाही.