नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्यावर एकदम कडवट आणि तखिट भाषेत टीका केलेय. शशी थरुर हे ब्रिटीशांची अनौरस संतती असून ते सुटा-बुटातील वेटर आहेत, असा जहरी हल्लाबोल स्वामी यांनी यांनी केलाय. थरुर यांच्या इंग्रजी बोलण्यावरुन आणि त्यांच्या कपड्यांवरुन स्वामी यांनी त्यांना टार्गेट केलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बचाव करताना स्वामी यांनी सुटा-बुटातील वेटर असल्याचा टोमणा मारलाय.
काँग्रेस नेते शशी थरुर यांनी पंतप्रधान मोदी मुस्लीम टोपी आणि हिरव्या रंगाचे कपडे घालण्यापासून लांब राहतात, अशी टिका केली होती. त्यानंतर स्वामी यांनी थरुर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. स्वामी म्हणाले की, थरुर यांच्या वक्तव्यामुळे नॉर्थ ईस्टच्या लोकांना त्रास झाला आहे. हे त्यांच्या वक्तव्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे. ते कॉकटेल पार्टीतून बाहेर पडलेले नाही. मंत्री बनले, एमपी बनले तरीही त्यांना काही फरक पडलेला नाही. कॉकटेल पार्टीमध्ये इंग्रजांचे लावारीस मुलं असतात. त्यांची संस्कृती देखील इंग्रजांसारखी असते. त्यांची भाषाही इंग्रजांसारखी असते. इंग्रजांच्या लष्करातील जवान जसे ब्लडी हेल वगैरे शब्द वापरात तशीच यांची भाषा असते, असे स्वामी म्हणाले.
थरुर यांना नागा टोपी पसंद नाही. पण स्वत: सूट-बूट घालून वेटर सारखे दिसतात आणि एखाद्या रेस्टॉरंटमधील बटलर सारखे वाटतात. समाजाने अशा लोकांवर बहिष्कार टाकायला हवा, असेही स्वामी म्हणाले.
#WATCH: Subramanian Swamy reacts on Shashi Tharoor's remark 'why does PM refuse to wear a Muslim skull cap? Have seen him in hilarious Naga head dress&various extraordinary outfits', says 'tumhara suit-boot ajeeb nahi hai hamare liye? Suit-boot pehen ke tum waiter jaise lagte ho' pic.twitter.com/F1CT5B6FyZ
— ANI (@ANI) August 7, 2018