'या' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला YouTuber; कमाईचा आकडा वाचून तुम्ही सुरु कराल चॅनेल

Success Story : एका सामान्य गृहिणीपासून यूट्यूब स्टार प्रवास बिलकुल सोपा नव्हता. empty nest syndrome या आजाराने त्रस असताना मानसिक तणावात वावरताना निशा मधुलिका यांनी ब्लॉग सुरु केला. आज त्या वयाच्या 60 वर्षी भरघोस कमाई करत आहेत. एवढंच नाही त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला YouTuber बनल्या आहेत. 

नेहा चौधरी | Updated: Sep 12, 2024, 11:51 AM IST
'या' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला YouTuber; कमाईचा आकडा वाचून तुम्ही सुरु कराल चॅनेल  title=
Success Story nisha madhulika Are India Richest Female Youtuber nisha madhulika net worth

Youtuber Nisha Madhulika Net Worth : आज सोशल मीडिया हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक विभाज अंग झालंय. एकदी साध्या साध्या गोष्टी असो, नेटकऱ्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले जातात. सध्या गणेशोत्सवाचा सण उत्साहात साजरा करण्यात येतोय. अशात प्रत्येक जण गणेशाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. खरं तर सोशल मीडिया हे फक्त मनोरंजनाचं साधन राहिलं नाही तर ते एक पैसे कमाविण्याच उत्तम साधन झालं आहे. आज आपल्यातील कला ओळखून असंख्य लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवत आहेत.

आज आपण अशाच महिलेची कहाणी जाणून घेणार आहोत. जी मानसिक तणावाने ग्रासली असताना वयाच्या 60 मध्ये तिने युट्यूबवर किचनमधील पाककलाकृतीचे व्हिडीओ तयार करुन ते सोशल मीडियाच्या युट्यूबवर शेअर केले. आज ही महिला भारतातील सर्वात श्रीमंत युट्यूबर बनली आहे. सोशल मीडियावर तिने आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. या महिलेच नाव आहे निशा मधुलिका...या सोप्या पद्धतीने आणि विशेष म्हणजे घरात जे उपलब्ध आहे त्यातून ती स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by NishaMadhulika (@nishamadhulika_cooks)

खरं तर सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या पॉटफार्मवर असंख्य महिला असो किंवा पुरुष हे पदार्थ शिकवतात. त्यांचा सबस्क्रायबर वर्गही तेवढ्याच मोठा आहे. अशा दुनियेत निशा मधुलिका यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. ज्या वयात लोक निवृत्त होऊन लेकी सुन्यांवर घराची जबाबदारी सोपवतात आणि आराम, फिरायला जायचा विचार करतात. त्या वेळी मधुलिका यांनी युट्यूबरवर आपलं चॅनेल सुरु केलं. त्यामागील कारणही तेवढीच सोप नाही. त्यांना empty nest syndrome या आजाराने त्रस असताना मानसिक तणावात वावरताना निशा मधुलिका यांनी ब्लॉग सुरु केला. 

निशा मधुलिका ही उत्तर प्रदेशची आहेत. तिथेच त्यांचे शिक्षण पूर्ण झाले आणि त्यानंतर दिल्लीतील एका कुटुंबात त्यांचा विवाह झाला. तिला दोन मुलं आहेत जी आता मोठी झाली आहेत आणि त्यांच्या कामात व्यस्त आहेत, अशा परिस्थितीत जेव्हा निशा मधुलिकाला एकटेपणा वाटू लागला तेव्हा तिने आपला छंद इतका वाढवला की तो आता आर्थिक लाभाचा ठरला आहे. 

 2011 मध्ये यूट्यूब चॅनेलला सुरुवात केली

निशा मधुलिका यांनी 2007 मध्ये सगळ्यात पहिले स्वतःची वेबसाइट काढली. त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी यूट्यूबवर कुकिंगचे व्हिडीओ अपलोड करण्यास सुरुवात केली. हा तो काळ होता जेव्हा 1 GB डेटा विकत घेण्यासाठी जवळपास 300 रुपये खर्च यायचा. इंटरनेट आजच्या इतकं सामान्य नव्हतं. बहुतेक लोक कॅफे किंवा ब्रॉडबँडच्या माध्यमातून इंटरनेट एक्सेस वापरत होते. अशा स्थितीत हळूहळू त्यांचे व्हिडीओ लोकप्रिय व्हायला लागले होते. आज त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर 14.4 मिलियनहून अधिक सब्सक्रायबर्स असून त्यांच्या अधिकृत चॅनेलवर 2200 व्हिडीओ तुम्हाला पाहिला मिळतील. 

निशा मधुलिका यांचेंयूट्यूब चॅनल केवळ कुकिंग व्हिडीओंपुरते मर्यादित नाही तर त्यांनी ऑनलाइन साम्राज्य उभारलं आहे. 5 जणांची प्रोफेशनल टीम हे सर्व मॅनेज करत असते. त्यांच्या यशामागे या टीमचाही मोठा हातभार आहे, असं त्या आवर्जून सांगत असतात. जे त्यांचे व्हिडीओ बनवण्यापासून ते एडिटिंग आणि प्रमोशनपर्यंतचं काम अगदी आवडीने करतात. 

या सगळ्यातून निशा मधुलिका यांनी मीडिया रिपोर्टनुसार 43 कोटींच्या घरात संपत्ती कमावली आहे. YouTube जाहिराती, स्पॉन्सर्ड कंटेंट आणि ब्रँड डील हे त्यांचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. त्या केवळ यूट्यूबवरच नाही तर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही सक्रिय आहे. निशा यांचं कुटुंब त्यांचं प्रेरणास्त्रोत आहे, अशा त्या अनेक मुलाखतीत सांगत असतात.