साखरेच्या किमतीत प्रति क्विंटल ५० रूपयांची घसरण

कारखान्यांकढून वाढलेला पुरवठा आणि घाऊक बाजारातील घटलेली मागणी याचा साखरेच्या दरावर परिणाम दिसून आला. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही साखरेच्या दराला फकटा बसला असून, साखरेचे दर प्रति क्विंटल ५० रूपये दराने घसरले.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 17, 2017, 04:25 PM IST
साखरेच्या किमतीत प्रति क्विंटल ५० रूपयांची घसरण  title=

नवी दिल्ली : कारखान्यांकढून वाढलेला पुरवठा आणि घाऊक बाजारातील घटलेली मागणी याचा साखरेच्या दरावर परिणाम दिसून आला. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही साखरेच्या दराला फकटा बसला असून, साखरेचे दर प्रति क्विंटल ५० रूपये दराने घसरले.

मार्केटमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यांकडून सततचा वाढता पुरवठा आणि पितृपंधरवड्यामुळे शीतपेय, आईस्क्रीम यांसारख्या कंपन्यांकडून साखरेची घटलेली मागणी याचा परिणाम साखरेच्या दरावर झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार एम.३० आणि एस.३० साखरेची किंमत ५०-५० रूपयांनी घटून ती या आठवड्यातील अनुक्रमे ३,९३०-४,०५० रूपये आणि ३,९२०-४,०४० रूपये प्रति क्विंटलवर थांबले. साखर कारखान्यांकडील पुरवठ्यानुसार एम.३० आणि एस.३० साखरेच्या किमतीत २०-२० रूपयांची घसरण झाली. ही घसरण अनुक्रमे ३,६००-३,७५० रूपये आणि ३,५९०-३,७४० रूपये प्रति क्विंटलवर थांबली.