नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता आणि गुरादसपूरचा खासदार सनी देओलला (Sunny Deol) ला केंद्र सरकारने बुधवारी वाय दर्जाची सुरक्षा (y category security) पुरवलीय. नव्या कृषी कायद्यासंदर्भात केंद्र सरकारचे समर्थन करणारे विधान केल्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सनी देओलच्या वाय दर्जा सुरक्षेमध्ये दोन कमांडो आणि ११ सुरक्षाकर्मी असतील.
गेल्या आठवड्यात गुरुदासपूर खासदार सनी देओल एक ट्वीट केलं होतं. हे प्रकरण शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये राहीले पाहीजे असे सनीने या ट्वीटमध्ये म्हटले होते. तसेच लोकं शेतकऱ्यांना भडकवत असल्याचे विधान देखील त्याने केले होते. काही लोकं परिस्थितीचा फायदा घेऊ इच्छित असून अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते शेतकऱ्यांबद्दल विचार करत नाहीत. त्यांचा तो अजेंडा असू शकतो. मी माझी पार्टी आणि शेतकऱ्यांसोबत उभा आहे आणि कायम राहीन. आमचं सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करते आणि नक्कीच यातून चांगले परिणाम दिसतील असे सनी देओलने म्हटले होते.
२२ दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. शेतकरी दिल्ली बॉर्डरवर आंदोलन आंदोलन करतायत. आतापर्यंत याप्रकरणी कोणताही निष्कर्ष निघाला नाहीय. याप्रकरणी सनी देओलचे वडील धर्मेंद्र यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. मी माझ्या शेतकरी बांधवांचे दु:ख पाहून व्यतीथ झालोय. सरकारने लवकरच यावर मार्ग काढायला हवा असे धर्मेंद्र यांनी म्हटले होते.