Viral video : खराखुरा 'कमरतोड डान्स' पाहून तुम्हाला हसूही येईल आणि रागही... कसं एकदा पाहा....

लेका नाचायचं होतं, हे काय केलं तुम्ही..... 

Updated: Sep 3, 2021, 04:30 PM IST
Viral video : खराखुरा 'कमरतोड डान्स' पाहून तुम्हाला हसूही येईल आणि रागही... कसं एकदा पाहा....
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : कमरतोड, स्टेज तोड, माईंड ब्लोईंग डान्स असं आपण अनेकदा ऐकलं आहे. किंबहुना अनेकदा पाहीलंही असावं. किंवा मग एखाद्याच्या अफलातून डान्स पाहून त्याला अशीच एखादी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली असेल. पण, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून, यामध्ये खराखुरा कमरतोड परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे. 

एका इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जिथं दोन पठ्ठे आपल्या धुंदीत डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा डान्स अगदी विचित्र असून, मध्येच त्यातला एकजण समोर असलेल्याला उचलून घेताना दिसतो. 

बरं इतक्यावरच न थांबता उचलून घेतलेल्याला तो दाणकन खाली आपटतो. साधंसुधं नाही खरंच अतिशय जोरात आपटतो, इकतं की आपल्यासोबत नेमकं काय झालं हेच त्याला कळत नाही. 

खाली आपटल्यानंतर हा उत्साही डान्सर पुन्हा उठून नाचण्यास सुरुवात करतो. पुन्हा तेच, समोरचा मित्र त्याला पुन्हा एकदा एखाद्या मुंगीला उचलावं तितक्या सहजतेनं उचलतो आणि खाली आपटतो. हा असा विचित्र डान्स नेमका का हे कळायला मार्ग नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Funny Videos  (@funny.reels.videos)

हा व्हिडीओ पाहून अनेकांनीच आपल्याला बेफाम हसायला आल्याचं म्हटलं आहे, तर काही नेटकऱ्यांनी समोरच्याला उचलून आपटणाऱ्याबाबत संताप व्यक्त केला आहे. नाचायला सांगितलेलं आपटायला नाही, असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याला शब्दांचा मार दिला आहे.