Super Snow Moon 2019: माघ पोर्णिमेचा सर्वात मोठा चंद्र

19 फेब्रुवारी रोजी देशभरात माघ पोर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. 2019 मधील माघ पोर्णिमेचे विशेष वैशिष्ट्य देशवासियांना अनुभवता येणार आहे. 

Updated: Feb 18, 2019, 03:58 PM IST
Super Snow Moon 2019: माघ पोर्णिमेचा सर्वात मोठा चंद्र   title=

मुंबई : भारतात पोर्णिमेचे अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक पोर्णिमेमागे एक गोष्ट दडलेली आहे. भारतात पोर्णिमेला धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले जाते. पोर्णिमेत आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो तो म्हणजे चंद्र. लहान मुलांना चंद्राचे फार कुतूहल असते 19 फेब्रुवारी रोजी देशभरात माघ पोर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. 2019 मधील माघ पोर्णिमेचे विशेष वैशिष्ट्य देशवासियांना अनुभवता येणार आहे. या वर्षीचा चंद्र फार मोठा असणार आहे. हा विशाल आणि सुंदर चंद्र इतिहास जमा होणार आहे. 

याआधी ही अशा अनेक पोर्णिमा झाल्या आणि विज्ञानाने प्रत्येक वेळेस चंद्राला वेगवेगळे नाव दिले. माघ पोर्णिमेच्या चंद्राला Super Snow Moon 2019 असे नाव दिले आहे. नासाने सांगितल्याप्रमाणे ' पोर्णिमेच्या रात्री चंद्र जेव्हा जमीनच्या अगदी जवळ असतो तेव्हा चंद्र सर्वात चमकदार आणि मोठा दिसतो. अशा पोर्णिमेला चंद्राचा प्रकाश बाकी पोर्णिमेच्या चंद्रापेक्षा अधिक असतो.' 

 

भारतात कधी दिसणार Super Snow Moon 2019

'सुपर स्नो मून' भारतात 19 फेब्रुवारी रोजी रात्री 11.23 वाजता दिसणार आहे. चंद्रचा पूर्ण आकार बघण्यासाठी दुर्बिणीचा वापर करू शकता. 19 फेब्रुवारी 2019 नंतर असा चंद्र 2026 रोजी अनुभवता येणार आहे.

माघ पोर्णिमा हा सण बौद्ध धर्मात मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तथागथांनी माघ पोर्णिमेलाच आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. या पोर्णिमेला बुद्ध मुर्तींची मिरवणूक काढून अष्ठशीलाचे व्रत केले जाते.