Tata Sons-Cyrus Mistry case : सायरस मिस्त्री यांना मोठा धक्का, अध्यक्षपदाच्या लढतीत टाटा विजयी

Tata Sons-Cyrus Mistry case, Supreme Court Verdict: सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांना मोठा धक्का बसला आहे. टाटा सन्स (Tata Sons chairman) आणि सायरस मिस्त्री प्रकरणी आज सर्वोच्च न्यालयाने (Supreme Court) आपला निकाल दिला आहे. 

Updated: Mar 26, 2021, 01:29 PM IST
Tata Sons-Cyrus Mistry case : सायरस मिस्त्री यांना मोठा धक्का, अध्यक्षपदाच्या लढतीत टाटा विजयी title=

मुंबई : Tata Sons-Cyrus Mistry case, Supreme Court Verdict: सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांना मोठा धक्का बसला आहे. टाटा सन्स (Tata Sons chairman) आणि सायरस मिस्त्री प्रकरणी आज सर्वोच्च न्यालयाने (Supreme Court) आपला निकाल दिला आहे. अध्यक्षपदाच्या लढतीत उद्योगपती रतन टाटा हे विजयी झाले आहेत. सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हटविण्यास योग्य म्हटले आहे. त्यामुळे रतन टाटांचा विजय झाला आहे. तर मिस्त्री यांना या निकालाने मोठा धक्का बसला आहे.

टाटा सन्स लिमिटेड ही टाटा समूहाची कंपनी आणि शापूरजी पालनजी ग्रुपचे सायरस मिस्त्री यांच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या निकालानुसार सर्वोच्च न्यायालयाने टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटवण्याचे औचित्य सिद्ध केले आहे. त्याचबरोबर, टाटा आणि मिस्त्री या दोन्ही समूहानी एकत्रितपणे हा वाद सोडवावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड नॅशनल कंपनी लॉ अपील न्यायाधिकरण (एनसीएलएटी) च्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती.  ज्यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती ए.एस. बोपन्ना आणि व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला आहे. एनसीएलएटीने आपल्या आदेशानुसार, 100 अरब डॉलर्सच्या टाटा समूहाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सायरस मिस्त्री मिस्त्री यांना पुन्हा नियुक्त केले होते.

शापूरजी पालोनजी समूहाने न्यायालयात सांगितले होते, शापूरजी पालनजी (एसपी) समूहाने 17 डिसेंबर रोजी न्यायालयात सांगितले होते, ऑक्टोबर 2016 मध्ये झालेल्या बोर्ड बैठकीत मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून काढून टाकले गेले होते. तो एक घात होता. हे कंपनीच्या कामकाजाच्या तत्त्वांच्या विरोधात होते.