इंदूर : भय्यू महाराज मृत्यूप्रकरणाबाबत लवकरच मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात ब्लॅकमेलिंगचा मोठा संशय पोलिसांना आहे. त्याबाबत काही नवी माहिती उघड होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अजूनपर्यंत २० जणांचा जबाब नोंदवला आहे. भय्यू महाराजांना अश्लील व्हिडिओवरून ब्लॅकमेलिंग करण्याचा आरोप असलेल्या तरूणीची अनेक तास चौकशी करण्यात आली. भय्यू महाराजांना धमकावण्यात आल्याचे आरोप तरूणीने फेटाळले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून विनायकसह अन्य कर्मचाऱ्यांचीही चौकशी कऱण्यात आली. या सर्व प्रकरणात विनायककडून बहुतांश माहिती मिळेल अशी पोलिसांना आशा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार भय्यू महाराज यांचा माजी ड्रायव्हर कैलाश पाटीलने पोलिसांना माहिती दिली होती की, तरुणी भय्यू महाराजांना त्यांचे काही व्हिडिओ आणि खासगी वस्तू असल्याचं सांगून त्यांना ब्लॅकमेल करत होती. या प्रकरणात २५ वर्षाच्या तरुणीची चौकशी करण्यात आली. ही तरुणी भय्यू महारांज्या आत्महत्येपूर्वी त्यांची मुलगी कुहूचा सांभाळ करायची असं तिने पोलिसांना सांगितंल. तरुणीला नोटीस पाठवल्यानंतर ती स्वत: चौकशीसाठी आली होती असं पोलिसांनी सांगितलं आहे.
विनायक दुधाडे हा भय्यू महाराजांच्या आत्महत्येनंतर अचानक चर्चेत आला होता. जेव्हा भय्यू महाराजांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांचे वित्तीय अधिकार, बँक खाती आणि संपत्तीबाबतचे अधिकारी विनायकला देण्यात यावे असं म्हटलं होतं. विनायक गेली १५ वर्ष भय्यू महाराजांसोबत होता.