नवी दिल्ली : विदेशातील काळा पैसा भारतात आणण्यासाठी विद्यमान केंद्र सरकार फारच आग्रही आहे. मात्र, स्विस बॅंकेतील या काळ्या पैशाबाबत सरकारला जोरदार झटका बसला आहे. काळ्या भांडार म्हणून ओळखली जाणारी स्विस बॅंक ही स्वित्झर्लंडमध्ये आहे. आणि येथील एका राजकीय पक्षाने भारताला भ्रष्ट देश म्हणत स्विस बॅंकेतील डेटा द्यायलाही विरोध केला आहे. स्वित्झर्लंडमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या स्विस पीपल्स पार्टी (एसवीपी)ने भारतासह ११ देशांना भ्रष्ट आणि हुकूमशाहीवाले देश संबोधत करचुकवेगिरी किंवा करफसवेगिरीशी संबंधीत डेटा देण्यास नकार दिला आहे.
'द वायर'ने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, स्वित्झर्लंड आणि भारत यांच्यात 2016 मध्ये एक करार झाला होता. ज्यात दोन्ही देशांकडून करचोरीला आळा घालण्यासाठी देशांतर्गत असलेली संशायस्पद बॅंक खाती आणि त्याबाबतची माहिती देण्याचा उल्लेख होता. मात्र, एसवीपी हा एक मोठा पक्ष असल्यामुळे राजकारणातील गणीते बदलल्यास स्वित्झर्लंडची भूमिकाही बदलू शकते. त्यामुळे भारताच्या काळ्या पैशाच्या मोहीमेला खिळ बसू शकते.
दरम्यन, स्वित्झर्लंड हा एक अशा देशांपैकी एक देश आहे. ज्या देशात भारतातून नेलेला सर्वाधीक काळा पैसा येथील बॅंकांमध्ये जमा केला जातो, असा आरोप आहे. जगभरातून आलेला काळा पैसा स्विस अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावतो असे मानले जाते.