Crime News In Marathi: अंधश्रद्धेचे भूत एकदा चढलं की ते उतरवणे खूप कठिण असते. भारतात आजही खेड्यापाड्यात अनेक अंधश्रद्धा मानल्या जातात. 21व्या शतकात अजूनही काही आजार झाल्यास डॉक्टरांकडे न जाता मांत्रिकाकडे जातात. मात्र कधी कधी त्यांच्या उपचारांमुळं जीव जाण्याची वेळ येते. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील एका महिलेसोबत घडला आहे. मांत्रिकाकडे उपचारांसाठी नेलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, मांत्रिक मात्र फरार झाला आहे.
इटावा गावात हा प्रकार घडला आहे. मानसिकदृष्ट्या कमजोर असलेल्या महिलेला भूताने पछाडले आहे असं म्हणत तिच्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने तिला पाइपाने बेदम मारहाण केली त्यानंतर तिच्या मानेवर उभे राहत मांत्रिकाने तिची निर्घृण हत्या केली आहे. तर, तिच्या कुटुंबीयांनी सात दिवसांत त्यांची मुलगी ठिक होईल, असं आश्वासन देत मांत्रिक तिथेन फरार झाला आहे. कुटुंबीयांनी मुलीच्या मृत्यूनंतर 24 तासांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे.
सुरेश सक्सेना हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. पती, पत्नी एक मुलगा आणि मुलगी असा त्यांचा परिवार आहे. सुरेश यांची मुलगी प्रिया हिचे लग्न झालेले आहे. सुरेश यांच्या पत्नीने म्हटलं होतं की त्यांची मुलगी मानसिकदृष्ट्या आजारी असून तिला अन्य आजारांनीदेखील ग्रासले आहे. त्यामुळं ती माहेरीच राहत होती. अनेक ठिकाणी तिच्यावर उपचार करण्यासाठी नेले होते मात्र, त्याचा काहीच गुण आला नाही. काही दिवसांपूर्वी सुरेश यांनी एका मांत्रिकासोबत संपर्क केला होता. त्याने प्रियाची परिस्थिती त्यांना सांगितली. त्यानंतर तो मांत्रिक तिला पाहण्यासाठी घरी आला. त्याने प्रियाला पाहताच तिच्यावर भूत-प्रेताची बाधा झाल्याचं म्हटलं होतं.
मांत्रिकाने दावा केला की तंत्रविद्याच्या माध्यमाने तिचा आजार बरा होईल. शुक्रवारी मांत्रिकाने त्यांच्याच घरी होम-हवन केले होते. शनिवारी रात्री भूतबाधा झाल्याच्या बहाण्याने प्रियाला पाण्याच्या पाइपाने मारहाण केली आणि त्यानंतर तो तिच्या मानेवर उभा राहिला. त्यातच तिचा मृत्यू झाला. पण मांत्रिकाने प्रिया सात दिवसांत पूर्णपणे ठिक होईल, असं आश्वासन देत तिथून पळ काढला. मात्र, रविवारी संध्याकाळी कुटुंबीयांना जाणीव झाली की त्यांची मुलगी आता जिवंत नाही. तेव्हा त्यांनी पोलिसांना याबाबत सर्व माहिती दिली.
एसपी सिटी कपिल देव यांनी म्हटलं आहे की, प्रिया ही मानसिक रोगी होती. मांत्रिकाने केलेल्या अमानुष मारहाणीने तिचा मृत्यू झाला आहे. महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून त्याचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. आरोपी तांत्रिकाला अटक करण्यात आली आहे.
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.