नोटबंदी आणि GST ने देशाला काय मिळाले?

अर्थ मंत्री अरूण जेटलीने इकोनॉमिक सर्व्हे 2018 सादर केलं आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 29, 2018, 04:43 PM IST
नोटबंदी आणि GST ने देशाला काय मिळाले?  title=

मुंबई : अर्थ मंत्री अरूण जेटलीने इकोनॉमिक सर्व्हे 2018 सादर केलं आहे. 

इकोनॉमिक सर्व्हेत अर्थ वर्ष 2018 मध्ये जीडीपी ग्रोथ 6.75 टक्के असण्याची शक्यता आहे. अर्थ वर्ष 2019 मध्ये जीडीपी ग्रोथ 7-7.5 टक्के असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. चालू वित्त वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्था किती आहे याची माहिती देखील इकोनॉमिक सर्व्हेमध्ये देण्यात आली. 

रिपोर्टनुसार जीएसटी, एफडीआयच्या नियमांमध्ये सवलत आणि वाढत्या एक्सपोर्टमुळे चालू वित्त वर्षात दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थाने रफतार पकडली आहे. नोटबंदी आणि जीएसटी सारख्या गोष्टींमध्ये फरक पडला आहे. 

इकोनॉमिक सर्व्हेतील 10 महत्वाच्या बातम्या 

FY18 मध्ये जीडीपी ग्रोथ 6.75 टक्के राहणार 
FY19 मध्ये जीडीपी ग्रोथ 7 ते 7.5 टक्के राहणार 
FY19 मध्ये क्रूडची किंमत 12 टक्केने वाढणार 
क्रूड किंमतीत झालेली वाढ चिंताजनक 
निजी निवेशमध्ये रिकवरीची आशा 
व्याज दरात वाढ झाली
मर्यादित काळात रोजगार, शिक्षण, एग्रीवर फोकस होणार
FY18 एग्री ग्रोथ 2.1 टक्के राहणार
FY18 GVA ग्रोथ 6.6 टक्के असून 6.1 टक्के असणार
3.2 हून अधिक जास्त वित्तीय तोटा हे चिंतेची बाब
मॅन्युफ्रॅक्चरिंग ग्रोथ 8 टक्के राहणार