मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देत आहे. ज्यामुळे फ्रेशर्सना देखील यामोठ्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. विज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी TCS इंटर्नशिप प्रोग्राम चालवत आहे आणि त्यांनी तरुणांकडून अर्ज मागवले आहेत.
कंपनीने म्हटले आहे की, TCS इंटर्नशिप 2022 कार्यक्रमांतर्गत तरुणांना वरिष्ठ संशोधकांसोबत खूप काही शिकण्याची संधी मिळेल.
हा कार्यक्रम औद्योगिक R&D वातावरणात संशोधन करते आणि उद्योगातील समस्या सोडवण्यासाठी तरुणांना तयार करतो. याच कार्यक्रमाअंतर्गत तरुणांना इंटर्नशिप ऑफर केली जात आहे.
यासाठी कोण अर्ज करू शकतं?
TCSने या कार्यक्रमासाठी पीएचडी विद्वानांसह एमएस, एमटेक आणि बीई किंवा बीटेकच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत. मात्र, हे विद्यार्थी संगणक विज्ञान शाखेतीलच असावेत. याशिवाय मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, गणित, गेम डिझाइन आणि ऑर्गनायझेशनल बिहेविअर या विषयांतील विद्यार्थीही अर्ज करू शकतात.
प्रोग्रामचा कालावधी
कंपनीतर्फे दोन प्रकारचे इंटर्नशिप प्रोग्राम चालवले जात आहेत. यामध्ये दीर्घकालीन आणि अल्प कालावधीचा इंटर्नशिप प्रोग्राम कंपनी चालवत आहे.
अल्पकालीन इंटर्नशिप प्रोग्रामचा कालावधी सहा ते आठ आठवडे असेल, तर दीर्घकालीन कार्यक्रमाचा कालावधी 16 ते 18 आठवडे असेल. कंपनीने सांगितले आहे की, विशेष परिस्थितीत इंटर्नशिपचा कालावधी देखील कमी केला जाऊ शकतो.
या भागात इंटर्नशिप प्रोग्राम चालवले जातील
- R&D शी संबंधित मालमत्तेची निर्मिती.
- शीर्ष परिषद आणि जर्नल्ससाठी शोधनिबंध प्रकाशित करणे.
- उद्योग स्केल डेटासाठी अर्ज करण्यासाठी प्रोटोटाइपचा विकास.
- औद्योगिक संशोधन आणि तंत्रज्ञानातील उदयोन्मुख ट्रेंडचे ज्ञान.
- संशोधन समस्या निश्चित करणे आणि त्याचे निराकरण करणे.