Teachers Day | आज शिक्षक दिवस का साजरा केला जातो? काय आहे इतिहास? जाणून घ्या

आपण भारतात 5 सप्टेंबर शिक्षक दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीनिमित्त साजरा करण्यात येतो.

Updated: Sep 5, 2021, 10:49 AM IST
Teachers Day | आज शिक्षक दिवस का साजरा केला जातो? काय आहे इतिहास? जाणून घ्या title=

नवी दिल्ली : आज देशात शिक्षक दिवस साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरूंना सन्मानित करतात. परंतु 5 सप्टेंबर रोजीच का शिक्षक दिवस साजरा केला जातो. त्याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आपण भारतात 5 सप्टेंबर शिक्षक दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीनिमित्त साजरा करण्यात येतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी तब्बल 40 वर्षे एका शिक्षक म्हणून काम केले होते. 

शिक्षक दिवस साजरा करण्याची सुरूवात 1962 पासून सुरू झाली. जेव्हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 5 सप्टेंबरला आपल्या जन्मदिवशी आपल्या कार्यालयात पोहचले. तेथे त्यांचे काही विद्यार्थी आणि मित्र उपस्थित होते. ते या दिवसाला विशेष स्वरूपात साजरा करू इच्छित होते. डॉ. राधाकृष्णन यांनी कोणतीही उत्सवबाजी करण्यास मनाई केली. आणि हा दिवस देशातील सर्व शिक्षकांना समर्पित करावा असे म्हटले. तेव्हापासून 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो.

Teacher's Day: इनकी याद में आज के दिन मनाया जाता है शिक्षक दिवस, जानें क्या है कहानी?

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवनपट
आजच्या दिवशी तामिळनाडुच्या तिरुमनी मध्ये 1888 मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला होता. त्यांना विद्यार्थ्यांना शिकवणे आवडत असे. त्यांनी फिलॉसॉफीमध्ये एमए केले.  त्यानंतर त्यांनी वर्ष 1916 मध्ये मद्रास रेसिडेंसी कॉलजमध्ये फिलॉसॉफीचे असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केले.  काहीच वर्षात ते प्रोफेसर झाले.

कोलंबो आणि लंडनसारख्या विद्यापीठांनीही डॉ. राधाकृष्णन यांना सन्मानित केले. 1949-1952 पर्यंत ते मास्कोमध्ये भारतीय राजदुत राहिले. त्यानंतर 1952 मध्ये त्यांना उपराष्ट्रपती बनवण्यात आले. ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. तसेच त्यांना भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारने म्हणजेच भारतरत्नानेही सन्मानित करण्यात आले होते.