पटना : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे मुख्य लालू प्रसाद यादव यांची Z+ सुरक्षा काढल्याने त्यांचा मोठ मुलगा माजी मंत्री तेजप्रताप यादव चांगलाच भडकला आहे.
तेजप्रताप यादवने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या मुलाने लग्नात तोडफोड केल्यावर धमकी दिल्यानंतर आता त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चामडी सोलण्याचं विधान केलंय.
#WATCH: Lalu Yadav's son Tej Pratap responds to question on his father's security downgrade, says, 'Narendra Modi Ji ka khaal udhedva lenge' pic.twitter.com/FER7rIBjoK
— ANI (@ANI) November 27, 2017
आरजेडीचे मुख्य लालू प्रसाद यादव यांच्या सुरक्षेत कपात झाल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांचा मुलगा म्हणाला की, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चामडी सोलून काढेल. आमचं प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये येणं-जाणं असतं. लालूजी सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. अशात त्यांची सुरक्षा काढणे म्हणजे त्यांची हत्या करण्याचा प्लॅन केला जात आहे. आम्ही याचं सडेतोड उत्तर देऊ आणि नरेंद्र मोदी यांची चामडी सोलून काढू.
दरम्यान, केंद्र सरकारने लालू यादव यांची सुरक्षा श्रेणी Z+ काढून Z केली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात नॅशनल सिक्युरीटी गार्डना परत बोलवण्यात आलंय. तेज प्रताप यादवने गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्याबद्दलही वादग्रस्त विधान केलं होतं. तो म्हणाला होता की, सुशील मोदींना घरात घुसून मारणार.