तेजप्रताप यादव वाटणार २१ हजार एलईडी बल्ब

तेजप्रताप यादव येत्या १५ जानेवारीला एलईडी बल्ब वाटणार आहेत.

Updated: Dec 29, 2018, 03:53 PM IST
तेजप्रताप यादव वाटणार २१ हजार एलईडी बल्ब title=

पाटणा : मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक क्लृप्त्या लढवल्या जातात. आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि ते अबाधित ठेवण्यासाठी हळदी-कुंकू, छत्रीवाटप यासारख्या हंगामी कार्यक्रमांचे आयोजन पक्षाकडून किंवा स्थानिक राजकारण्यांकडून केले जाते. असाच काही प्रकार राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव करणार आहेत.

ही आहे योजना

तेजप्रताप यादव येत्या १५ जानेवारीला एलईडी बल्ब वाटणार आहेत. या एलएडी बल्बचे वाटप पक्ष कार्यालयात आणि बांके बिहारी मंदिरात करण्यात येणार आहे. या एलईडी बल्ब वाटपाचे पोस्टर पाटणा शहरात लावण्यात आले आहेत. या बल्ब वाटपाच्या प्रयोगामुळे राजदच्या नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तेजप्रताप यादव एलईडी बल्ब वाटून गरीबांचे घर प्रकाशमय करण्याचे प्रयत्न करत असल्याचे, राजदचे मुख्य प्रवक्ता भाई वीरेंद्र यांनी सांगितले.

सूत्रांच्या माहितीनुसार, ही पोस्टर्स सुजीत सिंग या राजदच्या नेत्याकडून लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. परमार यांचा बल्बचा व्यवसाय करतात. परमार यांनी लावलेल्या पोस्टरमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मोफत एलईडी बल्ब वाटपाच्या नावाखाली परमार आपला स्वार्थ साधून घेत आहेत. या बल्ब वाटपातून ते दिल्ली, हरिद्वार आणि जयपूर येथे असलेल्या निवासी इमारतींचे प्रमोशन करत आहेत. बल्ब वाटपाच्या लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये याचा नामोल्लेख केला आहे. 

हीच का समाजसेवा ?

तेजप्रताप यादव यांच्या मोफत बल्ब वाटपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यामुळे तेजप्रतापच्या हेतूबद्दल शंका निर्माण करण्यात आली आहे. मंत्री जयकुमार सिंग यांनी या बल्ब वाटपावर खरमरीत टीका केली आहे. बल्ब वाटून आपल्या प्रकल्पाची जाहिरात करण्यात कोणती समाजसेवा आहे, असा सवाल विरोधक विचारत आहेत.