BJP CM Slams Akbaruddin Owaisi: तेलंगणामधील निवडणूक प्रचारादरम्यानचा इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एआयएमआयएमचे नेते अकरबरुद्दीन ओवेसी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये ओवेसी बंधूंपैकी धाकट्या भावाने एका पोलीस अधिकाऱ्याला कथित स्वरुपात धमकावल्याचं दिसत आहे. ओवेसींच्या व्हिडीओवरुन आता भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. हा असला प्रकार आसाममध्ये घडला असता तर काय झालं असतं याबद्दल बिस्वा सरमा यांनी भाष्य केलं आहे.
हिमंता बिस्वा सरमा यांनी अकरबरुद्दीन ओवेसी यांनी असं विधान आसाममध्ये केलं असतं तर 5 मिनिटांमध्ये त्याचा हिशेब चुकता केला असता, असं म्हटलं आहे. मी अकरबरुद्दीन ओवेसी हा पोलिसांनी धमकावणारा व्हिडीओ पाहिला आणि ऐकला. असं जर आसाममध्ये झालं असतं तर पुढल्या 5 मिनिटांमध्ये त्याचा हिशोब लावला असता, असं विधान जाहीर सभेत हिमंता बिस्वा सरमांनी केलं.
तेलंगणमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असून याच निवडणुकीच्या एका प्रचारसभेमला तेलंगणमध्ये हिमंता बिस्वा सरमा संबोधित करत होते. या सभेत सरमा यांनी, "तेलंगणमधील लोक भाजपाची सरकार बनवणार आहे. काल मी जेव्हा विमानतळावरुन येत होतो तेव्हा मी हिमंता अकरबरुद्दीन ओवेसींचा एका व्हिडीओ पाहिला. ते एका पोलीस निरिक्षकाला धमकावत आहेत. तसेच पोलीस हे ऐकून घेताना दिसत आहे. तेलंगणमध्ये भाजपाची सरकार आली तर अशाप्रकारे पोलिसांना शिव्या देण्याची कोणाची हिंमत होईल का? तुम्हीच एका विचार करा की इथे कसली कमतरता आहे? इथे एकदा भाजपाचं सरकार आलं की तेलंगणही सरळ मार्गाने चालू लागेल," असं म्हणत ओवेसींवर निशाणा साधला.
अकरबरुद्दीन ओवेसींच्या वादग्रस्त विधानाच्या व्हिडीओचा उल्लेख करत हिमंता बिस्वा सरमा यांनी, "मी जेव्हा अकबरुद्दीने यांचा हा व्हिडीओ पाहिला तेव्हा हैराण झालो. देशात अजून लोकशाही आहे की मुघल शासन आहे? आपल्याला देशाला पुढे घेऊन जायचं आहे. असे प्रकार इतर ठिकाणीही होत होते. उत्तर प्रदेश, आसाममध्येही असे प्रकार व्हायचे. मात्र जेव्हा उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये भाजपाचं सरकार आलं त्यांनंतर आम्ही या अशा प्रकरणांना आळा घालण्याचं काम केलं. आता तिथे पोलीस किंवा सरकारी अधिकाऱ्यांना धमकावण्याची कोणाची हिंमतही होत नाही. कोणीच अशी हिंमत करत नाही," असं म्हटलं.
"काँग्रेस असो किंवा बीआरएस असो सर्व एकाच वर्गातील आहेत. सर्व लोक द्वेष पसरवण्यासाठी काम करत आहेत. तेलंगणमध्ये इतर कोणी राहतच नाही केवळ एकच समाज राहतो असं वाटतं. आपल्याला तेलंगणाला बदलायला हवं. आपल्याला बदल घडवायचा आहे," असं हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.
तेलंगणमध्ये 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 5 राज्यांच्या निवडणुकीचे निकाल 3 डिसेंबर रोजी लागणार आहेत. 2018 च्या निवडणुकीमध्ये टीआरएसने 88 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 19, एआयएमआयएमने 7, टीडीपीने 2 आणि भाजपाने एक जागा जिंकलेली.
सभा सुरु असतानाच 10 वाजून गेल्याचं मंचाजवळ असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने घड्याळाकडे बोट दाखवून सूचित केलं. त्यानंतर अकबरुद्दीन ओवेसी भाषण देतादेताच संपापले. चाकू आणि गोळ्यांचा सामना केल्यामुळे मी कमकूवत झालोय असं वाटतंय का तुम्हाला? माझ्यात अजूनही हिंमत आहे. पाच मिनिटे अजून उरली आहेत, मी आणखी पाच मिनिटे बोलणार आहे. मला थांबवू शकेल असा कोणी मायका लाल जन्माला आलेला नाही असं अकबरुद्दीन ओवेसी मंचावरुन म्हणाले. मी एक इशारा केला तर तुम्हाला इथून पळ काढावा लागेल, असंही ओवेसींनी म्हटलं. त्यानंतर अकबरुद्दीन ओवेसी तावातावात पोलीस अधिकाऱ्याच्या दिशेने गेल्याचंही पाहायला मिळालं.
#WATCH | Telangana: AIMIM leader Akbaruddin Owaisi threatened a police inspector who was on duty and asked him to leave the spot while he was addressing a campaign in Lalitabagh, Hyderabad yesterday. The police inspector asked him to conclude the meeting on time as per the Model… pic.twitter.com/rf2tJAOk3b
— ANI (@ANI) November 22, 2023
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार रात्री दहा वाजल्यानंतर जाहीर सभेमधून निवडणुकीचा प्रचार करता येत नाही. ध्वनीक्षेपणासंदर्भातील नियमांमुळे हे निर्बंध घालण्यात आले आहेत. या प्रकरणामध्ये असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या धाकट्या भावाची बाजू घेतली आहे. पोलिसांनी इशारा दिला तेव्हा 10 वाजून 1 मिनिटं झाला होता. माझ्या भावाला भाषण देण्यपासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला असा दावा करत असदुद्दीन ओवेसींनी भावाची बाजू घेतली. या प्रकरणामध्ये ओवेसी बंधूंविरोधात गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.