Video : दिवसाढवळ्या 100 जणांनी घरात घुसून तरुणीला साखपुड्याच्या दिवशीच पळवलं; असा आखला अपहरणाचा प्लॅन

Telangana : एकाच वेळी मुलीच्या घरावर 100 जणांनी हल्ला केला आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. यानंतर मुलीला घेऊन पळ काढला

Updated: Dec 10, 2022, 02:51 PM IST
Video : दिवसाढवळ्या 100 जणांनी घरात घुसून तरुणीला साखपुड्याच्या दिवशीच पळवलं; असा आखला अपहरणाचा प्लॅन title=

Crime News : तेलंगणातील हैदराबादमध्ये शुक्रवारी 100 तरुणांच्या जमावाने जबरदस्तीने एका घरात घुसून एका 24 वर्षीय तरुणीचे अपहरण (Telangana Dentist's Kidnap) केल्याचा प्रकार समोर आलाय. या तरुणीचा शुक्रवारी साखरपुडा होणार होता. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तासाभराच्या शोधानंतर पोलिसांनी तरुणीचा सुखरूप सुटका केली असून काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे.

100 जणांनी एकाच वेळी केला हल्ला

तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्ह्यातील आदिबाटला गावात एका तरुणीचे तिच्याच घरातून अपहरण करण्यात आले. पीडित तरुणी ही बीडीएस (बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी) पदवीधर असून ती घरीच सर्जन म्हणून काम करत होती. मुलीच्या पालकांनी आरोप केला की, सुमारे 100 तरुण त्यांच्या घरात घुसले आणि त्यांच्या मुलीला जबरदस्तीने घेऊन गेले. व्हिडिओमध्ये, किमान 30 लोक घराची तोडफोड करताना, कारच्या काचा तोडताना आणि एका व्यक्तीला घराबाहेर ओढताना आणि लाठ्या-रॉडने मारहाण करताना दिसत आहेत.

मुलीच्या घरासमोरच उघडले दुकान

नवीन रेड्डी नावाच्या तरुणाने हा सर्व प्रकार घडवून आणल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. नवीन हा मुलीला त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी त्रास देता होता. नवीनकडे एका चहाच्या दुकानाची फ्रॅचाईंजी होती. त्याने मुलीच्या घरासमोरच एक दुकान उघडले होते. नवीन त्याच्या चहाच्या दुकानातील कामगारांना समोर राहणाऱ्या त्याच्या बायकोने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला आणि त्याला तिला घरी घेऊन जायचे आहे. ती तरुणी कथितरित्या रिलेशनशिपमध्ये होती, पण त्याच्यासोबत लग्न केल्याचा दावा तिने फेटाळला.

मुलीला पोलिसांनी घेतले ताब्यात

अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. काही तासांच्या तपासानंतर पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतले. पोलिसांनी 18 जणांना अटक केली असली तरी मुख्य आरोपी नवीन अद्याप फरार आहे. पोलिसांनी सांगितले की ते इतर लोकांची ओळख पटवण्याचा आणि अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.