तेलगु सिनेसृष्टीतील धक्कादायक वास्तव या व्हिडिओतून आलं समोर

श्री रेड्डी यांच्यावरील वाद काही करून शांत होण्याच नाव घेत नाही. 

Updated: Apr 19, 2018, 11:05 AM IST
तेलगु सिनेसृष्टीतील धक्कादायक वास्तव या व्हिडिओतून आलं समोर  title=

मुंबई : श्री रेड्डी यांच्यावरील वाद काही करून शांत होण्याच नाव घेत नाही. तेलगु अभिनेत्रीने भर रस्त्यात कपडे काढून आपल्याला टॉलिवूडमध्ये किती त्रास होत असल्याचं सांगितल होतं. कास्टिंग काऊचच्या मुद्यावरून साऊथ सिनेमांमध्ये असलेले प्रश्न तिने सर्मांसमोर मांडले होते. आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. श्री रेड्डीच्या समर्थनाकरता आता एक अभिनेत्री समोर आली आहे. 

ही कलाकार आली मदतीला 

तेलगु सिनेमांमध्ये होणाऱ्या कास्टिंग काऊचचा मुद्दा आणखी गाजतो आहे. आता याबाबत आणखी एक अभिनेत्री समोर आली आहे. टॉलिवूडमध्ये गेल्या 10 वर्षांपासून काम करत असलेल्या महिला कलाकार संध्या नायडू या श्री रेड्डी यांच्या समर्थनात उतरली आहे. तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तीने असं म्हटलं आहे की, शुटिंगच्या वेळी ते मला अम्मा म्हणत असतं. आणि रात्री झोपण्यासाठी सांगत असे. जर कोणत्याही सिनेमांसाठी काम मागण्यास गेलो तर कायम विचारलं जात असे की, या बदल्यात काय मिळणार? काम संपवल्यानंतर घरी आल्यास व्हॉट्सअॅपवर जबरदस्तीने बोलायला सांगत असे. 

हैदराबादमध्ये केलं होतं प्रोटेस्ट 

10 ते 15 महिला कलाकारांनी एकत्र येऊन या साऊथ इंडस्ट्रीतील काळ्या गोष्टीबाबत प्रोटेस्ट केलं होतं. सगळ्या महिला कलाकार कोणत्याही सिनेमांत छोट्या - मोठ्या रोलसाठी संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली जाते.