अखेर टीडीपी एनडीएतून बाहेर, अविश्वास ठराव आणणार

तेलगु देसमच्या दोन खासदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता तेलगु देसम एनडीएमधून बाहेर पडली आहे.

Amit Ingole Updated: Mar 16, 2018, 10:56 AM IST
अखेर टीडीपी एनडीएतून बाहेर, अविश्वास ठराव आणणार title=

अमरावती : तेलगु देसमच्या दोन खासदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता तेलगु देसम एनडीएमधून बाहेर पडली आहे.

अमरावती येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा करण्यात आला. शुक्रवारी (१६ मार्च) ला झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आंध्रप्रदेशला विशेष दर्जा देण्याबाबत टीडीपी आणि कॉंग्रेसकडून भाजपवर लागोपाठ दबाव टाकला जात आहे. याआधी टीडीपीच्या दोन मंत्र्यांनी आपला राजीनामा दिला होता. 

केंद्र सरकार आंध्र प्रदेशला विशेष दर्जा द्यायला तयार नव्हतं. या मुद्द्यावरुन तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू नाराज होते. काही दिवसांपूर्वीच टीडीपीचे केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू आणि वाय एस चौधरी यांनी राजीनामा दिला होता. टीडीपीचे १६ खासदार आहेत. सध्या भाजप खासदारांची संख्या २७३ म्हणजे काठावर पास एवढी आहे....