या 8 गोष्टींसाठी Reject होऊ शकतो तुमचा Insurance claim, आजच जाणून घ्या नाहीतर होऊ शकतो Problem

खरेतर हे टर्म प्लॅन घेताना त्यात काही असे नियम असतात जे तुम्हाला माहित असणे गरजेचे असते.

Updated: Jul 29, 2021, 06:43 PM IST
या 8 गोष्टींसाठी Reject होऊ शकतो तुमचा Insurance claim, आजच जाणून घ्या नाहीतर होऊ शकतो Problem title=

मुंबई : टर्म इंश्योरन्स पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर क्लेमची रक्कम त्या कुटुंबातील व्यक्तींना आधार देते.  यासाठीच खरेतर लोकं असाप्रकारचे विमा घेतात, कारण ते जरी या जगात नसले तरी, त्यांच्यामागे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. परंतु बऱ्याचदा अशा बातम्या देखील समोर आल्या आहेत, ज्यात विमा कंपन्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर त्यांच्या कुटुंबीयांकडून केलेला क्लेम रिजेक्ट करतात. ज्यामुळे आपण अशा इंश्योरन्स पॉलिसीमध्ये पैसे भरावेत की, नाहीत असा विचार करतो, परंतु असे का होते? तुम्हाला माहित आहे का?

खरेतर हे टर्म प्लॅन घेताना त्यात काही असे नियम असतात जे तुम्हाला माहित असणे गरजेचे असते. टर्म प्लॅनमध्ये प्रत्येक प्रकारच्या मृत्यूवर तुम्हाला क्लेम करता येत नाही.

त्यामुळे टर्म प्लॅन घेण्यापूर्वी कोणत्या प्रकारच्या मृत्यूवर कंपनी क्लेम देत नाही हे तुम्हला माहित असणे गरजेचे आहे.

1. नशेत दुर्घटना झाली : जर टर्म प्लान घेतलेल्या व्यक्तीचा नशेत गाडी चालवताना अपघात झाला, तर अशा वेळेस त्या व्यक्तीच्या मृत्यूवर पैसे क्लेम करण्यासाठी प्रॉबलम येऊ शकतो. त्याशिवाय ड्राग्स किंवा दारुचा ओव्हर डोस होऊन एखाद्याचा मृत्यू झाला, तर त्याच्यावर देखील कंपनी क्लेम रक्कम देत नाही.

2. आत्महत्या : जर टर्म पॉलिसी धारकाने आत्महत्या केली तर, लिंक्ड प्लॅन अंतर्गत 100 टक्के पॉलिसी फंड मिळू शकतो. परंतु नॉन लिंक्ड प्लॅन घेतला असेल, तर यासाठी 80 टक्के क्लेम रक्कम मिळते.

3. नॉमिनी द्वारा पॉलिसीधारकची हत्या : जर पॉलिसी धारकाची हत्या झाली आणि त्यात नॉमिनी संशयीत असेल तर, यावर नॉमिनी क्लेम करु शकत नाही. परंतु जेव्ह हा नॉमिनी दोषमुक्त होईल तेव्हा कंपनीला याला क्लेम रक्कम द्यावी लागेल.

4. आपराधीक गोष्टीत पॉलिसी धारक : जर कोणत्या आपराधीक गोष्टीत पॉलिसी धारक अडकला असेल आणि त्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला कंपनीकडून क्लेम करता येणार नाही किंवा ही रक्कम मिळणार नाही.

5. खतरनाक स्टंट करताना मृत्यू : जर पॉलिसी धारकाचा खतरनाक स्टंट करताना मृत्यू झाला तरी देखील विमा कंपनी क्लेम रक्कम देत नाही. स्काय डायविंग, स्कूबा डायव्हिंग, बंजी जंपिंग, कार किंवा बाईक रेस सारखे स्टंटचा यामध्ये समावेश आहे.

6. गंभीर आजार लपवणे : जर पॉलिसी धारकाने एखादा मोठा आजार विमा कंपनीपासून लपवला तर अशा परिस्थितीत विमा रक्कम मिळत नाही. या गंभीर आजारात HIV/AIDS सारख्या आजारात क्लेमची रक्कम मिळत नाही.

7. नैसर्गीक आपत्तीने मृत्यू : जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळे होत असेल तर, त्यावर क्लेम मिळत नाही. जसे भूकंप, सायक्लोन इत्यादी.

8. प्रसुती दरम्यान मृत्यू : जर पॉलिसी धारक महिलेचा एखाद्या मुलाला जन्म देताना मृत्यू झाला तर, अशा केसमध्ये पॉलिसी रक्कम क्लेम केली जाऊ शकत नाही.