जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एक जवान ठार

Updated: Jun 14, 2018, 09:23 AM IST

जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरमध्ये बांदीपोरात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झालेत. तर एक जवान शहीद झालाय. शनिवारी पनेर गावात दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीवर हल्ला केला होता. त्यानंतर लष्करानं शोधमोहीम सुरू केली. त्या मोहिमेदरम्यानच ही चकमक झाली. त्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झालाय.

गेल्या तीन दिवसांत जम्मू काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात आणि पाकिस्तानच्या गोळीबारात सात जवान शहीद झालेत. मंगळवारी अनंतनाग आणि पुलवामात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, त्यात दोन पोलीस शहीद झाले होते. बुधवारी सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात तीन अधिकाऱ्यांसह चार जवान शहीद झाले होते. तर आज एक जवान शहीद झालाय.