जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर जवानांची कारवाई

 सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरु

Updated: Nov 19, 2019, 04:12 PM IST
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर जवानांची कारवाई
संग्रहित फोटो

श्रीनगर : सुरक्षा रक्षकांना मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्याच्या तळाबाबत माहिती मिळाली. या माहितीनंतर, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर जवानांकडून कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांनी तेथून विस्फोटक आणि वायरलेस सेट जप्त केले आहेत. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सुरनकोट जंगलात स्थानिकांना काही संशयास्पद आवाज आल्यानंतर, सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. त्या ठिकाणावरुन ७ आयईडी, गॅस सिलेंडर आणि एक वायरलेस सेट धिरच्या जंगलातून जप्त करण्यात आला. याप्रकरणी कोणालाही ताब्यात घेण्यात आलं नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

भारतीय सेना आणि पोलीस यांनी संयुक्तपणे या भागातील सर्च ऑपरेशन सुरु केलं. आतापर्यंत कोणत्याही संशयीत दहशतवाद्याला पकडण्यात आले नसून सर्च ऑपरेशन सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

  

दुसरीकडे, जम्मू-राजोरी महाामार्गावर दहशतवाद्यांकडून स्फोटके ठेवून मोठी आपत्ती घडवून आणण्याचा प्रयत्न सुरक्षा दलाकडून हाणून पाडण्यात आला. राजोरीपासून १२ किलोमीटर दूर जम्मू हायवेवर सेनेच्या पेट्रोलिंग पार्टीला २ ठिकाणी स्फोटकं ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षादलाकडून सुरक्षितपणे IED निकामा करण्यात आला.